आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या मृत्यूनंतर तिसर्‍या दिवशी पतीचीही आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव - तालुक्यातील घुसर्डी येथे सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली होती. या घटनेस तीन दिवस उलटत नाही, तोच आज त्या विवाहितेच्या पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत चर्चेला ऊत आला आहे.
तालुक्यातील घुसर्डी येथील शिवाजी पंडित सोनवणे (वय 26) यांची पत्नी रंजना सोनवणे हिने पैशांसाठी होत असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मृत रंजनाचे वडील ईश्वर खंडू अहिरे (रा. वाडे) यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत शिवाजी सोनवणे, जेठ विनोद सोनवणे, सासरे पंडित सोनवणे, सासू पमाबाई सोनवणे, आजे सासरे भीमा गाढवे (सर्व राहणार घुसर्डी) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक एम.डी. वाघ करत आहेत.

अन् पतीनेही मृत्यूला कवटाळले : पत्नी मृत्यूला तीन दिवस उलटत नाही तोच पती शिवाजी सोनवणे याने गुरुवारी सकाळी 7.15 वाजेपूर्वी घुसर्डी शिवारातील दिलीप सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पोलिस पाटील रूपसिंग परदेशी यांनी दिलेल्या माहितीवरून भडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

शिक्षेच्या भीतीपोटी आत्महत्येची चर्चा
पत्नीने जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आपल्याला त्रास होऊन शिक्षा होईल, या भीतीमुळेच रंजनाचे पती शिवाजी सोनवणे याने आत्महत्या केली असल्याची चर्चा घुसर्डी गावासह परिसरात सुरू होती.