आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने केली अात्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पत्नीकडून चारित्र्यावर संशय घेऊन जीव देण्याची धमकी देण्याच्या प्रकारातून मानसिक त्रास करून घेत पतीने अात्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील फागणे गावात घडला. याप्रकरणी पत्नीविरुद्ध अात्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे.
सन २००९पासून सिद्धार्थ अशोक बैसाणे (वय ३०) याला पत्नी किरणबाई बैसाणे (रा.फागणे, ह.मु. चिलाणे, ता. शिंदखेडा) ही पोलिस ठाणे न्यायालयात केस करून त्याच्या चारित्र्यावर संशय घेत होती. घरगुती कारणावरून भांडण उपस्थित करून स्वत:ला जाळून जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी सिद्धार्थला देत असे. तसेच टोचून बोलून मानसिक त्रास दिल्याने तिच्या वागणुकीला त्रासाला कंटाळून सिद्धार्थ याने आॅक्टोबर रोजी पहाटे वाजेच्या सुमारास घराच्या छताला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सिद्धार्थची अाई सिंधुबाई अशोक बैसाणे (वय ५५, रा. फागणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किरणबाई सिद्धार्थ बैसाणे हिच्याविरुद्ध पतीस अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे करीत अाहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...