आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादातून मुलासह दांपत्याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर (जि. जळगाव) - कौटुंबिक वादातून ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (वय 32) यांनी आपली पत्नी संगीता (वय 25) व साई या पाचवर्षीय मुलासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जानवे (ता. अंमळनेर) येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.

पाटील दांपत्य 20 फेब्रुवारी रोजी एका लग्नासाठी सोनगीरजवळील दापोरे येथे गेले होते. 24 फेब्रुवारीला गावी परत येत असताना डांगरीजवळ उतरले. त्यानंतर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत मुलासह उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.

सोमवारी रात्री गारपीट झाल्याने डांगरी, जानवे परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ज्ञानेश्वरचे वडील शिवाजी पाटील मंगळवारी (ता.24) सकाळी पिकांचे नुकसान पाहण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना विहिरीजवळच मुलगा व सुनेची बॅग आढळली. विहिरीत पाहिले असता त्यांना तिघांचे मृतदेह तरंगताना दिसले.