आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन भूषण कॉलनीत विवाहितेची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामानंदनगरातील नवीन भूषण कॉलनीत बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला असलेल्या वॉचमनने पत्नीकडे मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे जाण्याचा आग्रह केला होता. याचा राग आल्याने पत्नीने शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भूषण कॉलनीत राहुल लडकरे या बांधकाम व्यावसायिकाच्या अपार्टमेंटचे काम सुरू आहे. त्याठिकाणी बळीराम बारेला (वय 31) हा वॉचमन म्हणून काम करतो. त्याच्यासोबत पत्नी जयवंताबाई बारेला (वय 27), एक मुलगा आणि एक मुलगी राहात होती. तर त्यांचा एक मुलगा बोरअजंटी (ता. चोपडा) येथे नातेवाइकांकडे शिकत आहे. बळीराम बारेला जामटी ता. वरला, जि. बडवाणी येथील रहिवाशी आहे. त्याठिकाणी शेतीचे काम करण्यासाठी जाण्याचा आग्रह त्याने पत्नीकडे धरला होता. त्याला तिचा विरोध होता. या कारणाने शुक्रवारी तिने बांधकाम सुरू असलेल्या तिसर्‍या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंद पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
समतानगर परिसरातील रहिवासी शेषराव मोहन चव्हाण (वय 45) यांनी राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी 5.10 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. शेषराव पाटील यांचे त्यांच्या पत्नीशी नेहमीच वाद होत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू
राधाकृष्णनगरातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे वाहनचालक मधुकर मोतीराम पाटील (वय 53) यांच्या मोटारसायकलीचा 25 मे रोजी पातरखेडा (ता.एरंडोल) येथे अपघात झाला होता. त्यांच्यावर ओम क्रिटिकल रुग्णालयात उपाचार सुरू होते. त्यांचा शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.