आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide News In Marathi, Nilesh Sonwane, Divya Marathi

आप्पा-आई, मला माफ करा!,पॉलिटेक्निकचा विद्यार्थी नीलेश सोनवणे याने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिव कॉलनीतील पॉलिटेक्निकच्या दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांने रविवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिव कॉलनी परिसरात तीन दिवसांत दोन जणांनी गळफास घेतला. शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास एका युवतीनेदेखील आजारास कंटाळून आत्महत्या केली होती.
खिशात आढळली चिठ्ठी
शिव कॉलनीतील प्लॉट नं. 13 मध्ये जिल्हा परिषदेचे निवृत्त केंद्रप्रमुख आर. वाय. सोनवणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या प}ी अरुणा या महापालिकेत लिपिक पदावर नोकरीला आहेत. तर मोठा मुलगा सुहास सिंचन विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीला आहे. त्यांचा लहान मुलगा नीलेश हा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या दुसर्‍या वर्षाला शिकत होता. रविवारी सायंकाळी नीलेशने शिव कॉलनीतील राहत्या घरी वरच्या मजल्यावर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाचा यश हा पाणी पिण्यासाठी गेला असता, त्याला नीलेशने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला मृत घोषित केले. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले आहे. याप्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सलग दुसरी घटना
शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास सोनाली रमेश टेकाडे (वय 22) या विद्यार्थिनीने शिव कॉलनीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिासांना सुसाइड नोट मिळाली. त्यात तिने म्हटले होते की, मी आजाराने हरली आहे. पुढच्या जन्मात माझे स्वप्न पूर्ण करेन, मला माफ करा, या आजाराने व मी करिअर शिवाय जगू शकत नाही, असे लिहिले होते. रविवारी नीलेश या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी जीवनात मी एकटा पडलो होतो. जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असा सुसाइड नोटमध्ये उल्लेख होता. मात्र, नेमके कारणाचा उल्लेख त्यात नव्हता.