आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्टीवर घरी आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- सुट्टीवर घरी आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहादा तालुक्यातील वडाळी गावात घडली आहे. मोहन सुभाष आहिरे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. मागील 10 दिवसापासून तो सुट्टीवर आला होता.

 

सकाळी 11 वाजता आपल्या राहत्या घरी त्याने आत्महत्या केली. तो 2011 मध्ये भरती झाला होता. तो श्रीनगर येथे 6 वर्षापासून कार्यरत होता. तो 2 महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आला होता.  त्याला सुट्टीवर येऊन10 दिवस झाले होते. त्याचा 3 वर्षांपुर्वी विवाह झाला होता. त्याला एक वर्षाची मुलगी आहे. तो अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, पत्नी, मुलगी, विवाहित बहिण, लहान भाऊ असा परिवार  आहे. संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

 

त्याला वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल नेण्यात आले होते. तेथून शहादा नगरपालिका रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात येत त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी  डाॅ.  जितेद्र पवार यांनी त्याचे  शवविच्छेदन करण्यात आले असल्याचे सांगितले. 


  सारंगखेडा पोलिस स्टेशनचे एपीआय मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय बागले तपास करीत आहेत. सारंगखेडा पोलिस स्टेशनला राजेद्र सुका झालटे (वय 50 रा. वडाळी) यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...