आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैनाबादच्या तरुणाची गळफास घेऊन अात्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अासाेदार स्त्यावरील जैनाबाद येथील तरुणाने बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात कुणी नसताना गळफास लावून अात्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. मात्र, अात्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
 
जैनाबाद येथील माेहन रवींद्र सपकाळे (वय २७) या तरुणाने बुधवारी सकाळी घरात काेणी नसताना त्याच्या पुतणीच्या झाेक्याची दाेरी सोडून गळफास लावून आत्महत्या केली. त्याची आई घरात आल्यानंतर त्यांना मोहन याने गळफास लावल्याचे दिसले. मुलाला अशा अवस्थेत बघून त्या भोवळ येऊन खाली पडल्या. मात्र, स्वत:ला सावरत त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने माेहनला खाली उतरवले. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीनंतर मृत घोषित केले. माेहन याचे वडील रवींद्र सपकाळे हे महापालिकेचे कर्मचारी अाहेत. त्यांच्या पश्चात एक भाऊ, अाई, वडील असा परिवार अाहे. ताे अविवाहित हाेता.