आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होणे प्रकृतीस हानिकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उन्हाळा ऋतू आणि गरम हवा यांचे जवळचे नाते आहे. त्याचा फटका लहान-मोठय़ांसह सगळ्यांनाच बसतो. अशा परिस्थितीत जवळ थंड पाण्याचा ग्लास नसेल तर उन्हाचा मार आणखी वाढतो. त्यामुळे तहान भागवण्यासाठी आपल्यासारखे अनेक जण फ्रीजमध्ये ठेवलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांचा विचार करतात; परंतु वारंवार असे करणे प्रकृतीसाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपल्याला अन्य पर्यायांचा विचार करणे योग्य ठरेल, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होणार नाही आणि प्रकृतीसुद्धा चांगली राहील.

मिल्क शेक
कमी फॅटचे दूध किंवा क्रीमसोबत फळांचे कॉम्बिनेशन काही वेगळेच असते. याचा स्वादच चांगला असतो असे नाही, तर त्वचेची चमक वाढवण्यातही याची भूमिका महत्त्वाची ठरते. सफरचंद, चेरी, खरबूज, आंबा, केळी यासारखी फळे मिसळून मिल्क शेक तयार क रता येतो.
लिंबूपाणी : लिंबूचा रस पाण्यात मिसळून लिंबूपाणी तयार केले जाते. काही लोक यात साखर व मीठ टाकून पितात. मुलांसाठी लिंबूपाणी अत्यंत फायदेशीर आहे. कारण मुले नेहमी उन्हात खेळत असतात. अशा परिस्थितीत त्यांना थंडावा व ऊर्जेची गरज असते. कृत्रिम पेयांच्या तुलनेत लिंबूपाणी जास्त पोषक असते.

घरात बनवलेली आइस टी
ताजेतवाने ठेवणारे हे थंड पेय तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे पेय घरात अत्यंत सोप्या पद्धतीने बनवता येते. यात अँँटिऑक्सिडेंट असते. याव्यतिरिक्त त्यात थोडी कॅफीनसुद्धा असते. स्वाद चांगला यावा म्हणून यात थोडीशी साखर, पुदिनाचे पत्ते व दालचिनीसुद्धा टाकू शकता.
लस्सी : चटपटीत किंवा गोड लस्सी सगळ्यांना आवडीची असते. लस्सीमुळे पचनक्षमता चांगली असते. दुपारी उन्हाच्या वेळेस लस्सी नाश्त्याचेही काम करते. बदाम किंवा फळांसोबत लस्सी आणखी चविष्ट बनवता येऊ शकते.

टरबूज
जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी-1’ , ‘बी-6’, ‘सी’, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखी पोषक तत्त्वे असलेले टरबूज उन्हाळ्यात सगळ्यात चांगले फळ आहे. हे फळ जीवनसत्त्व ‘बी’चा चांगला स्रोत असल्याने शरीरात ऊर्जा निर्माण करते. शरीरातील पाणी कमी होऊ न देण्यासाठी टरबूजचा रस फायदेशीर ठरतो. तसेच टरबूजमध्ये अँटिऑक्सिडेंटही असते.

नारळ पाणी
नारळ पाण्याचे अनेक फायदे असून, उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण नारळ पाणी शरीराला थंड ठेवते. तसेच रक्तसंचारदेखील वाढतो. न्यूट्रिशन व्हॅल्यूचा विचार केला तर कॅलरी काउंट नारळाच्या आकारावर अवलंबून असते. नारळ पाण्यात आढळून येणारे फायबर आणि अमिनो अँसिड मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर ठरते.

काळजी आरोग्याची
नारळाचे पाणी पिणे उपयोगी; सफरचंद, चेरी, खरबूज, आंबा, केळी यासारखी फळे मिसळून मिल्क शेक तयार करून पिणे योग्य