आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक परिषदेचे रविवारी जिल्हास्तरीय अधिवेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हास्तरीय अधिवेशन 9 फेब्रुवारीला प. न. लुंकड कन्या विद्यालयात होणार आहे. दिवसभर होणार्‍या चर्चेतून अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षक आमदार रामनाथ मोते, भगवान साळुंखे, परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू, सरचिटणीस नरेंद्र वातकर, विभागीय अध्यक्ष सुनील पंडित आदी उपस्थित राहणार आहेत.
न्यायालयीन लढाईबाबत मिळेल मार्गदर्शन
औरंगाबाद खंडपीठाचे अँड. शैलेश बोर्डे व अँड. महेंद्र भावसार हे न्यायालयीन लढाईसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. याव्यतिरिक्त दिवसभरात विविध सत्रात शिक्षकांच्या प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. आरटीईतील अडचणी, सेवाज्येष्ठता, वेतनर्शेणी, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या समस्येवर यावेळी मागदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्र.ह. दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनंत शिंदे, मनोहर मराठे हे देखील उपस्थित होते. अधिवेशनासाठी 600 ते 700 शिक्षक उपस्थित राहणार आहे.
संघटना नेत्यांच्या दावणीला
शिक्षण संघटना राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. त्यातच शिक्षण संस्थाही राजकीय पुढार्‍यांच्याच असल्याने शिक्षकांवरील अन्यायाला वाचा फोडणे कठीण झाले आहे. आज प्रत्येक शाळेचा कुठला ना कुठला वाद न्यायालयात गेला आहे. अशैक्षणिक कामे सोपविल्याने शिक्षणाचा मूळ उद्देश दूर पडत आहे, असे दलाल यांनी सांगितले.