आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे स्कूलची पाच हजार मुले बनताहेत बालवैज्ञानिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा विज्ञानाची ओळख आधुनिक काळात बालपणापासूनच होणे गरजेचे आहे, त्यामुळे भविष्यात त्यांना जगातील स्पर्धेशी जमवून घेणे सोपे होईल या दूरदृष्टीतून शहरात विज्ञानाची ओळख प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बालपणीच व्हावी असे प्रय} सुरू आहेत. विशेष म्हणजे,या उपक्रमात शहरातील पाचहजार बालवैज्ञानिक सहभागी झाले आहेत.
हल्लीच्या शिक्षण क्षेत्रातील जीवघेण्या स्पध्रेमुळे पाठांतराला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान शिकणे दूरच राहते. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाल्यास आत्मविश्वास वाढतो. या उद्देशाने संडे सायन्स स्कूलच्या माध्यमातून बालगोपाल प्रात्यक्षिकातून विज्ञानाचे धडे गिरवत आहेत. गणितानंतर नावडता विषय म्हणून मुले विज्ञानापासून दूर पळतात. तथापि, विज्ञानाच्या किमान बाबी बालवयातच मुलांनी आत्मसात केल्याने विज्ञान प्रदर्शन, होमी भाभा यासारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, नवनवीन संशोधनावर ते भर देत असल्याचे दिसून येत आहे.
स्वत:च तयार केले मॉडेल
मुले विज्ञानाचे विविध मॉडेल्स स्वत: तयार करून व वेगवेगळे प्रयोग करून विज्ञानाच्या संकल्पना समजून घेतात. संडे सायन्स स्कू लची लहान मुले विज्ञान प्रदर्शनात इतर मोठय़ा मुलांचे बिघडलेले मॉडेल तत्काळ दुरुस्त करून देतात. त्यामुळे सर्किट आणि त्याचे कार्य या बेसिक गोष्टी मुलांना बालवयात शिकायला मिळत आहेत.
हे विषय हाताळले
मुलांना सोलार कार, मॅग्नेटिझम, किचन सायन्स, एनर्जी, केमिस्ट्री, इलेक्ट्रिसिटी, रोबोटिक्स, व्होल्कॅनो, हवामानशास्त्र, साउंड, रिफ्लेक्शन असे विविध विषय मुलांनी स्वत: प्रयोगातून हाताळले.
5 हजार विद्यार्थ्यांमध्ये गोडी
अनेक मुलांनी तयार केलेले मॉडेल संकलित करून घरी छोटीशी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यानंतर बालवैज्ञानिक आपल्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना स्वत: बनवलेल्या मॉडेलची माहिती देतात. संडे सायन्स स्कूलने आतापर्यंत पाचहजार मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली आहे.
स्वयंपाकघर ही प्रयोगशाळा
गेल्या दहा वर्षांपासून कुतूहल फाउंडेशनने संडे स्कू लच्या माध्यमातून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. विज्ञानाची प्रयोगशाळा असलेल्या स्वयंपाकघरातील विविध सामग्रीतून प्रयोग कसे करायचे, याबाबतचे प्रशिक्षण आम्ही देतो. महेश गोरडे, अध्यक्ष, कुतूहल फाउंडेशन