आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 90 एसपीएफपर्यंत सनस्क्रीन लोशन बाजारात उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अल्ट्राव्हायलेट किरणांनी त्वचेचा बचाव करण्यासाठी आता 90 एसपीएफपर्यंत (सन प्रोटेक्शन फॅक्टर) सनस्क्रीन लोशन बाजारात आलेले आहे. एक वर्षाअगोदर 15 ते 24 एसपीएफचेच सनस्क्रिन खरेदी करता येत होते. परंतु आता हा स्तर 30 च्या कित्येक पटीने वर गेला आहे. याचसोबत वॉटरप्रूफ सनस्क्रिन ते ऑर्गेनिक सनस्क्रिनदेखील बाजारात पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर स्विमिंगला जाणार्‍यांसाठीसुद्धा वेगळे सनस्क्रिन मार्केटमध्ये आले आहे.

अल्ट्राव्हायलेट रेडिएशनमध्ये ए आणि बी ही दोन प्रकारची किरणे त्वचेला प्रभावित करतात. ए किरणांपासून त्वचा हळूहळू खराब होते आणि बी किरणांपासून त्वचा लगेच काळसर होते. याला सनबर्न म्हटले जाते. त्वचेसह पूर्ण शरीराचे संरक्षण केले तरीही स्किन टॅनिंग, पिगमेंटेशन आणि एजिंगची समस्या डोळ्यासमोर येते. या सगळ्या समस्यांपासून त्वचा दूर ठेवण्यासाठी आता कंपन्यांनी 90 एसपीएफ बाजारात आणले आहे. एसपीएफचा हा स्तर दरवर्षी वाढतच जात आहे. अगोदर 15 नंतर 24 मग 40 पासून आता लगेच 90 पर्यंतचे एसपीएफ सनस्क्रीन मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत.

स्विमिंग पूलसाठी देखील वेगळे
तुम्ही पोहायला जात आहात तर वॉटरप्रूफ लोशन घ्यायला हवे. न्युट्रेजिना कंपनीने नुकतेच वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ सनस्क्रिन अल्ट्राशीर बाजारात आणले आहे. ज्यात एसपीएफचा स्तर 50 पर्यंत असतो. जर तुम्ही समुद्र किनारी जात असाल तर फक्त 50 ते 90 एसपीएफमधीलच लोशन खरेदी कराल; नाही तर स्किन टॅन होण्याची दाट शक्यता असते.

40 डिग्रीच्या वरच 50 एसपीएफ
ब्युटिशियन अर्चना डिडवाणी सांगतात की, कोणत्याही सनस्क्रीन लोशनमध्ये एसपीएफचा स्तर 15 असेल तर तुम्ही फक्त 50 मिनिटेच उन्हाच्या सानिध्यात राहू शकतात. त्याचा परिणाम हा फक्त 50 मिनिटेच राहू शकतो. त्यामुळे आता जास्त एसपीएफच्या सनस्क्रिनची डिमांड होत आहे. 40 डिग्रीच्या वरील तापमानातच 40 ते 50 एसपीएफ असलेले लोशन वापरावे. एसीमध्ये राहणार्‍यांना 20 ते 30 एसपीएफदेखील चांगले असते.

ऑर्गेनिक सनस्क्रीन
वीएलसीसी कंपनीने ऑर्गेनिक सनस्क्रिन बाजारात उपलब्ध करून दिले आहे. ज्यामध्ये पांढरे चंदन, जोजोबा ऑइल, गाजर, एलोवेरा आणि काही फळांचे सत्त्व आहेत. 30 एसपीएफचे हे सनस्क्रिन लोशन नाजूक त्वचा असलेल्यांसाठी चांगले आहे. फेबइंडिया, लॅक्मे, बायोटिक, जॉय, गार्नियर, लॅक्टोकेलामाइन, हिमालयाने देखील नवीन रेंज मार्केटमध्ये आणली आहे.