आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‌‌उगीच नादाला लागाल तर दसनंबरी नागीण दाखवेन -सुप्रिया सुळे यांचा पलटवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘काेपर्डी अत्याचारप्रकरणी न्याय मिळावा, अशी अाम्ही नम्रपणे मागणी केली. मात्र त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराेधकांच्या कुंडल्या बाहेर काढण्याची भाषा करतात. काेणते शस्त्र कधी काढायचे हे अाम्ही ठरवू, अशी धमकीच त्यांनी विराेधकांना दिलीय.
कुंडल्या सांभाळायला हे मुख्यमंत्री अाहेत की ज्याेतिषी. ‘वायफाय’च्या युगातदेखील ते शस्त्र अाणि अस्त्रांच्या गाेष्टी करतात हे दुर्दैव अाहे. त्यांनी सुडाचे राजकारण करू नये. उगीच अामच्या नादाला लागू नका, तुम्ही अामचे कडूपण पाहिलेले नाही, ही मराठमाेळी सुप्रिया सुळे कुणाला घाबरत नाही. नाद कराल तर माझ्यातील दसनंबरी नागीण तुम्हाला दाखवेन,’ असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारला दिला.

जळगावात अायाेजित शेतकरी परिषदेत त्या बाेलत हाेत्या. व्यासपीठावर माजी मंत्री सुरेश धस, जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्यासह सर्व अाजी माजी खासदार- अामदार व स्थानिक पदाधिकारी उपस्थित हाेते. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, ‘काेपर्डीच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा हीच अामची मागणी अाहे. याप्रकरणात काेठेही राजकारण नव्हते. वेळेत दाेषाराेप दाखल न झाल्यास अाराेपी सुटले असते. असे हाेऊ नये म्हणून मी पुढे अाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विराेधकांच्या कुंडल्या बाहेर काढण्याची भाषा केली. अाम्ही अजूनही मुख्यमंत्र्यांना गाेडीत सांगण्याचा प्रयत्न करीत अाहाेत. कडूपण काय असते ते त्यांनी पाहिलेले नाही. त्यांनी महिलांच्या वाट्याला जाऊन शस्त्र वगैरेची भाषा करू नये. विराेधकांशी सुडाचे राजकारण करू नये. अन्यथा मराठमाेळी सुप्रिया त्यांना झाशीची राणी अाणि दसनंबरी नागीण काय असते हे दाखवेन, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, या परिषदेनंतर सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात अाले. केंद्रीय कृषिमंत्र्यांनादेखील भेटून निवेदन देणार असल्याचे या वेळी सांगण्यात अाले. तसेच या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही सुळेंनी घेतली. गटबाजी करणाऱ्यांची त्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे वृत्त अाहे.

‘समाधानी भाजप कार्यकर्त्याला एक लाखाचे बक्षीस देणार’
‘भाजपच्या माेठ्या घाेषणा अाणि मार्केटिंगला बळी पडलेले अनेक जण अाज पश्चात्ताप करीत अाहेत. ‘अच्छे दिन’ कुणालाही नाहीत. भाजपवालेदेखील खासगीत अामच्याजवळ रडतात. गेल्या दाेन वर्षांत एकाही शेतमालाचा भाव एक रुपयानेही वाढला अाहे, असे दरवाढ मिळाल्याचे कुणी दाखवून दिले तर त्याला एक लाखांचे बक्षीस दिले जाईल. असे फलक सर्वत्र लावले जाणार अाहेत. ‘सध्याच्या काळात समाधानी, खुश असलेला भाजप कार्यकर्ता दाखवा अाणि एक लाख रुपये मिळवा,’ असेही फलक लावले जाणार अाहेत. भाजपला नैतिकतेचे राजकारण येत नाही. ते नेहमीच सुडाचे राजकारण करतात. कुणालाही साेडत नाहीत, त्यांच्यातील लाेकांनादेखील हा पक्ष साेडत नाही याचे उदाहरण जळगावातच असल्याचा चिमटा खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंचे नाव न घेता काढला.
बातम्या आणखी आहेत...