आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत-नागपूर महामार्गाचे चाैपदरीकरण लवकरच - डाॅ.सुभाष भामरे यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सुरत-नागपूर महामार्गावर पंधरा दिवसांत दोन भीषण अपघात झाले. ते पाहता या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. मंत्रिपदानंतर शहरात प्रथमच अागमन झाल्यावर डाॅ. सुभाष भामरे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. तेथील जखमींची विचारपूस केली. त्या वेळी ते बाेलत हाेते.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्याजवळ एसटी बस कंटेनरदरम्यान शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातातील जखमींची विचारपूस केली. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, राहुल पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, गायत्री सैंदाणे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी उपस्थित होते. या वेळी डॉ. गुप्ता यांच्यासह डॉ. अजय सुभेदार, डॉ. प्रशांत देवरे यांनी जखमींवरील उपचारांबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना करताना सांगितले की, जखमींवर आवश्यक उपचार तातडीने करावेत. उपचारांमध्ये कोणतीही हयगय करण्यात येऊ नये, असे सांगतानाच वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाप्रमाणे रुग्णांची शुश्रूषा करून त्यांना दिलासा दिला. पंतप्रधान विमा योजनेतीलदहा लाख रुपयांची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना मिळेल या उद्देशाने एसटी महामंडळ आरोग्य यंत्रणेने प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना केली. तसेच या वेळी नागपूर-सुरत महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येईल.

बस चालकांना प्रशिक्षण
अपघाताचेप्रमाण कमी व्हावे तसेच एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी बसचालकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावा. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे डाॅ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...