आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड अंत:करणाने मोडला रहिवाशांनी स्वत:चा संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-सुरत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या अनेक टप्प्यातील एका कामाला शनिवारी सुरुवात झाली. सुरत मार्गावरील जळगाव हद्दीलगत दांडेकरनगरातील ८२ अतिक्रमित झोपड्या काढण्यात आल्या. हे अतिक्रमण हटल्याने या मार्गावरील जळगाव ते धरणगाव
31 किलोमीटरच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुहेरीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यास जलदगती गाड्यांचा दीड तास वेळ वाचू शकणार आहे. त्यासाेबतच दिल्लीसाठी नागपूरमार्गे जाणा-या मालगाड्या या मार्गे वळवून मुंबई-नागपूर मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे.
जळगाव-सुरत रेल्वेमार्गावर 355 किलो मिटर अंतराचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. या मार्गावर दररोज सुमारे 15 ते 20 हजार जण अप डाऊन करीत असतात. दुहेरीकरणात सोनगड ते व्यारा व्यारा ते नवापूर तसेच अमळनेर ते धरणगावदरम्यान काम पूर्ण झाले अाहे. मात्र, उधना ते साेनगड, नवापूर ते नंदुरबार नंदुरबार ते अमळनेर दरम्यानचे दुहेरीकरण अद्याप बाकी आहे. रेल्वेलाइनजवळील अतिक्रमणधारकांना रेल्वे प्रशासनाने शनिवारपर्यंत घरांचे अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याच्या नोटिसा दिल्‍या होता. त्यानुसार रहिवाशांनी शनिवारी सकाळीच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. या वेळी अतिक्रमणधारक आणि रेल्वे पोलिस, जिल्हा पोलिसांत संघर्ष होण्याची शक्यता होती. मात्र, अप्रिय असे काही होता कार्यवाही शांततेत पार पडली. काही जणांनी रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घेत काढलेले पत्रे सामान रेल्वेच्या गाड्यांमध्ये वाहून नेले.
पिंप्राळा-हुडकोच्या जागेत राजीव गांधी आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, हुडकोला पैसे दिल्याने सध्या हे काम बंद आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांना वास्तव्यासाठी कोठे जावे? असा प्रश्न पडला आहे. काही जण पिंप्राळा-हुडकोतील रिकाम्या जागेत काहींनी भाड्याच्या घरात राहण्याची व्यवस्था केली. काहींची व्यवस्था नगरसेवक राजू पटेल यांनी त्यांच्या आव्‍हाणे शिवारातील राज-मालतीनगरातील आपल्या मालकीच्या प्‍लॉटमध्ये केली. 16 जणांची व्यवस्था झाल्याने त्यांचे अतिक्रमण पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर रविवारी काढण्यात येणार आहे.