आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखावलेल्यांची माफी मागतो; चूक दादांची नव्हे, माझीच : रमेश जैन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव _ आक्रमकबेधडक स्वभावामुळे बऱ्याचदा स्वकीयांनाही दुखावणारे माजी महापौर रमेश जैन यांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील हतबलता आज स्पष्टपणे जाणवली. श्रीरामालाही वनवास सहन करावा लागला. ज्याप्रमाणे भरताने पादुका ठेवून कारभार पाहिला, तीच स्थिती माझीही झाली असून जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जवळ लांबचे कुणी दुखावले असेल तर ती चूक माझी आहे, दादांची नाही. सुरेशदादांनी क्षमायाचनादिनी माफी मागितली. मी सुद्धा कालही मागितली, आजही माफी मागतो, असे भावनिक उद््गार रमेश जैन यांनी काढले.
विधानसभा निवडणुकीसाठी विधान उमेदवार कोण? याकडे सगळ्यांचेच लक्ष ला
गून होते. हा संभ्रम दूर करण्यासाठी अन कार्यकर्ते समर्थकांना तयारीला लागण्याच्या सूचना करण्यासाठी रविवारी खान्देश सेंट्रलमध्ये शिवसेना महानगराचा संकल्प मेळावा झाला. यात घरकुल घौटाळ्यात आरोपी असलेले आमदार सुरेश जैन हे कारागृहात असो की, बाहेर तेच उमेदवार असतील यावर शिक्‍कामोर्तब करत त्यांना विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला. अध्यक्षस्थानी सहसंपर्कप्रमुख आर.आ.पाटील होते. महानंदा पाटील, इंदिरा पाटील, गुलाबराव वाघ, चित्रसेन पाटील, महापोरर राखी सोनवणे, प्रितेश ठाकूर, सलीम पटेल यांनीही आमदार जैन यांनाच उमेदवारी देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गजानन मालपुरे यांनी सूत्रसंचालन
विश्वासघातींना गाडा
सहसंपर्कप्रमुखआर.आर.पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. धरणांच्या कामांचे आताच कसे उद््घाटन होतेय, १५ वर्षे कुठे गेला होतात? असा सवाल करत मराठा मुस्लमिम समाजाचे आरक्षण म्हणजे केवळ गाजर असल्याचे ते म्हणाले, केंद्राप्रमाणे राज्यातही भुईसपाट करण्याचे आवाहन केले .
दगिते्गजांची गैरहजेरी
संकल्पमेळाव्याला उपनेते गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख किशारे पाटील, चंद्रकात पाटील आमदार चमिणराव पाटील, माजी आमदार कैलास पाटील यांची अनुपस्थिती हाेती. त्यांच्या अनुपस्थितीबाबत नेत्यांनी काहीही खुलासा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.
आमदार जैनांनी जबाबदारी सोपवली
आमदारसुरेश जैन हे कारागृहात असल्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्याला हजर राहणार नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास संदेश व्यासपीठावरील होर्डिंगवर देण्यात आला. ‘मी आज व्यक्तिश तुमच्यात उपिस्थत नाही... पण माझी जबाबदारी मात्र तुमच्या खांद्यावर आहे.’ असा तो संदेश होता. मेळाव्यात प्रत्येकांने कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वतच उमेदवार समजून काम करण्याचे आवाहन केले. त्यामुळे हे वाक्य प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
काय म्हटले जैन ?
सुरेशजैन यांना राजकारणाच्या पटलावरून दूर करण्याचा कुटिल डाव महाराष्ट्राला माहीत आहे.
रस्त्याच्या कडेला राहणाऱ्यांना घरकुले दिली; काही नतद्रष्ट्यांना जळगावची प्रगती पहावली गेली नाही. त्याकडे दुर्लक्ष करा.

दादांनी यापूर्वीच क्षमायाचनादिनी माफी मागितली आहे. ती आपली संस्कृती आहे. ज्याने त्याने संस्कृती तपासावी, आत्मनिरीक्षण करावे.

अनेक योजना सरकारकडे आहेत. परंतु जळगावला सापत्न वागणूक मिळते. शासन मदत करत नाही.