आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Jain And Eknath Khadse Discuss At Mumbai News In Marathi

जैन-खडसेंच्या मुंबईतील भेटीबाबत तर्क-वितर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्यास्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांनी शुक्रवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली. या वेळी रमेश जैन यांच्या पत्नी तथा माजी आमदार मधू जैनही त्यांच्या समवेत होत्या. या भेटीत शहर विकासाबाबत चर्चा करण्यात आली. या भेटीबाबत खडसे यांनीही दुजाेरा दिला असून जैन यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही प्रकल्प आणि पालिकेतील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राजकीय वर्तुळात या भेटीची जाेरदार चर्चा सुरू आहे.

या भेटीत महापालिकेवर असलेल्या कर्जावरील दंड कमी करावा, शहरासाठी भूमिगत गटारींच्या कामासाठी सहकार्य करावे, अशी विनंती जैन यांनी केल्याचे खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास जैन दांपत्याने खडसेंची भेट घेतली. या वेळी त्यांच्यात सुमारे अर्धातास चर्चा झाली.