आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suresh Jain And Eknath Khadse Political Friendship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ खडसे-सुरेश जैन ‘मैत्री’पर्वाचे राजकारण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाजप नेते एकनाथ खडसे अाणि शिवसेना आमदार सुरेश जैन यांच्यातील राजकीय शत्रुत्वाचे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले आहेत. मुळीच एकत्र न येण्याची जणू भीष्मप्रतिज्ञाच घेतलेल्या या दाेघांनाही आता बदलत्या राजकीय परिस्थितीने जवळ आणले आहे. त्यात आमदार जैन यांच्याकडून अालेल्या मैत्रीच्या प्रस्तावाला खडसेंनी प्रतिसाद दिल्याने आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चाहूल लागली आहे. युतीचे ज्येष्ठ पदाधिकारी असूनदेखील खडसे आणि जैन यांच्यात राजकीय शत्रुत्व आहे. विधान परिषद निवडणुकीत जैन यांच्यामुळे खडसेंचे पुत्र पराभूत झाल्यामुळे दाेघांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाेघांमधील राजकीय मैत्रीचे पर्व सुरू झाल्याने राजकीय पटलावर पुन्हा एकदा शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
जैन समर्थकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची पार्श्वभूमी आणि शक्यता
- राजकारणातील काही चुकांमुळे आमदार सुरेश जैन यांना घरकुलचे निमित्त करून आत डांबल्याची त्यांच्या समर्थकांची पक्की धारणा आहे. राजकीय कोंडी दूर करण्यासाठी शिवसेनेत असूनही त्यांच्या समर्थकांनी रमेश जैन यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार केला.
- केंद्रात आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असल्याने आमदार जैन यांची कारावासातून सुटका हाेण्यास मदत हाेईल, अशी त्यांना अपेक्षा होती. त्यादृष्टीने अाघाडीच्या काही नेत्यांशी चर्चादेखील झाली होती.
- निवडणुका अाटाेपल्यानंतर न्यायालयीन बाब असल्याचे सांगत अाघाडीच्या नेत्यांनी मदत नाकारल्याने जैन समर्थकांची अाशा फाेल ठरली.
- एकनाथ खडसेंमुळेच आमदार जैन अडकले आहेत. त्यामुळे सर्वच प्रयत्नांवर खडसेंकडून पाणी फेरले जाते. त्यात खडसे यांचा एकमेव अडथळा असल्याचेही जैन समर्थकांचे म्हणणे आहे.
- खडसेंशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात अाल्याने रमेश जैन यांनी हात पुढे केला.
- सुरेश जैन कारागृहात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत खडसेंनी शहर मतदारसंघात अपक्ष उमेदवार देऊन अाव्हान िनर्माण करू नये, यादृष्टीने जुळवून घ्यावे.
- अािर्थक अडचणीमुळे बरखास्तीच्या मार्गावर असलेल्या महापालिकेला खडसेंच्या माध्यमातून केंद्राची मदत मिळू शकते.
खडसेंकडून प्रतिसाद मिळाल्यामागची कारणे...
- मित्रपक्षाचे असूनदेखील आमदार सुरेश जैन यांनी विधान परिषद निवडणुकीत अपक्ष मनीष जैन यांना साथ देत खडसेंचे पुत्र तथा भाजपचे उमेदवार निखिल खडसेंचा पराभव केल्याने दाेघांमध्ये वितुष्ट वाढले.
- विरोधी पक्षनेते असतानादेखील मुलाचा झालेला पराभव खडसेंच्या जिव्हारी लागला हाेता. त्यातच एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने खडसेंचा जैनांना विरोध कायम रािहला.
- मुलाच्या झालेल्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या मनीष जैन यांचा रक्षा खडसेंनी लोकसभेत पराभव केल्याने खडसे समर्थकांमध्ये पराभवाचा राजकीय हिशेब चुकता केल्याची भावना आहे. त्यामुळे जुन्या दुखण्यावर पडदा पडला.
- मुख्यमंत्रिपदावर दावा करताना उत्तर महाराष्ट्रातील युतीचे सर्वच आमदार लाॅबिंग करण्यासाठी उपयाेगी येतील. त्यात सुरेश जैन यांच्याशी जुळवून घेतल्यास विरोधक राहणार नाहीत.
- मुख्यमंत्रिपदावर दावा करताना ज्येष्ठ पदाधिकारी असूनदेखीलजिल्ह्यातयुती टिकवता अाली नाही, हा आरोप हाेऊ नये म्हणून शिवसेनेचे आमदार जैन यांच्याशी मैत्रीसाठी हाेकार.
- खडसे वगळता भाजपचे सर्वच पदाधिकारी आमदार जैन यांच्याशी जुळवून घेतात. त्यामुळे पक्षात आमदार जैनांचे विरोधक म्हणून खडसे एकाकी पडले होते.
- ज्येेष्ठ पदाधिकारी असूनही वैयक्तिक मतभेदातून खडसेंकडून िमत्रपक्षाच्या नेत्याला हाेत असलेल्या टाेकाच्या विरोधाची दखल भाजप नेत्यांनीही
घेतली होती.