आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळ्याचे सूत्रधार सुरेश जैनच, 120 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्यभर गाजत असलेल्या जळगावच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी 120 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात शनिवारी दाखल करण्यात आले. आमदार सुरेश जैन यांच्याभोवती केंद्रित आरोपपत्रात त्यांनाच कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचे ठरवण्यात आले असून, राज्याचे कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकरांसह 53 जणांना त्यात सहभागी करण्यात आले आहे.
नगरपालिका असताना झालेल्या सुमारे 30 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आल्यानंतर सर्वप्रथम अटक झालेले माजी महापौर प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर, जगन्नाथ वाणी व तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या वेळी तपासाधिकारी ईशू सिंधू यांनी उर्वरित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून मुदत मागितली होती. ही मुदत संपत असतानाच शनिवारी हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्रात पहिल्या क्रमांकावर आमदार सुरेश जैन यांचे नाव आहे. राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अटक करण्यात आलेल्या उर्वरित 45 आरोपींचीही नावे आहेत.
आमदार जैन यांचा सहभाग कसा?
आरोपपत्राच्या तिसºया भागात 50पेक्षा अधिक पानांमधून या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार जैन यांचा या गुन्ह्यात व गुन्ह्यातील कटात कसा सहभाग आहे, ते मांडण्यात आले आहे. तसेच आमदार जैन यांना या गुन्ह्यातून झालेला आर्थिक फायदा व गुन्हा करताना वापरलेली नियोजनबद्ध कार्यपद्धती आरोपपत्रात नमूद आहे. संपूर्ण आरोपपत्र आमदार जैन यांच्याभोवती केंद्रित असले तरी, उर्वरित इतर आजी-माजी नगरसेवक असलेल्या आरोपींचाही त्यात समावेश आहे. सोमवारनंतर आरोपपत्राच्या प्रती मिळणार असल्याचे आरोपीच्या वकिलांना सांगण्यात आले.
घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयास प्राप्त
घरकुल घोटाळा - अपिलासाठी सिंधूंना मुहूर्त सापडेना
पालिकेचा घरकुल प्रकल्प नऊ वर्षानंतरही रखडलेलाच