आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suresh Jain Had Tremendous Influence On Corporators

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सुरेश जैनांनी सगळ्यांना दाखविले होते झोपडीमुक्त जळगावचे स्वप्न'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने जामीन मंजूर केलेले पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आमदार सुरेश जैन यांच्या सत्तापर्वात जळगाव पालिकेत लोकशाही कशा पद्धतीने नागविली जात होती, याचे भीषण चित्र पोलिसांना दिलेल्या जबाबात मांडले आहे.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होत नव्हती. कर्मचारी ठराव क्र.1 ते .... पर्यंत असे त्यातील तपशील न वाचता उच्चारत असत व हजर नगरसेवक हे मंजूर... मंजूर... मंजूर... म्हणून माना डोलवायचे. जैन यांच्यासमोर एकाचीही बिशाद नव्हती; त्यांना विरोध करण्याची कोणीही हिंमत करीत नसे. पक्षाच्या बैठकीत नगरसेवक व नगराध्यक्षांच्या को-या कागदांवर सह्या घेतल्या जात असत. नगरपालिकेच्या चेकबुकमधील को-या चेकवर सह्या घेतल्या जात होत्या. खान्देश बिल्डर्स यांनी 16/11/1999 रोजी पालिकेच्या मुख्याधिका-यांकडे केलेल्या अर्जावरून त्यांना वीस लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिला गेला. मात्र, या कागदपत्रांवर आपली सहीच नाही. कोणीतरी बनावट सही केली, असल्याचा धक्कादायक खुलासाही देवकर यांनी जबाबात केला आहे. मात्र, त्यांची बनावट सही करून 20 लाख रुपये हडपले जात असूनही इतकी वर्षे देवकर गप्प का राहिले, हा कळीचा मुद्दा आहे. त्यांनी याबाबत पोलिसांत अथवा पालिका प्रशासनाकडेही तक्रार केलेली नाही. घरकुलबाबत सुरेश जैन यांनी पक्षाच्या बैठकीत सर्वांना झोपडपट्टीमुक्त जळगाव शहर बनविण्याचे स्वप्न दाखविले होते, असेही देवकरांचा जबाब सांगतो. देवकरांनी 26/11/2011 रोजी दिलेल्या जबाबात उच्चाधिकार समिती सभापती म्हणून प्रदीप रायसोनी यांच्यावरच सर्व आरोपांचा रोख ठेवलाय. 02/02/2012 रोजी दिलेल्या जबाबात मात्र देवकरांनी सर्व रोख जैन यांच्यावरच केंद्रित केला आहे. ते स्वत: मात्र घोटाळ्यापासून अलिप्त राहू इच्छितात. स्वत:च्या उच्चाधिकार समिती सदस्यत्वाबाबत काहीही माहिती नाही. उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आल्याबाबतही मला माहिती नव्हती, असेही देवकर यांनी जबाबात म्हटले आहे.
प्रदीप रायसोनी यांनी पोलिसांना दिलेला जबाब त्यांच्याच शब्दात
जैन यांनीच घडवला अपहारः प्रदीप रायसोनीचा धक्‍कादायक जबाब
घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयास प्राप्त