औरंगाबाद - जळगावच्या घरकुल घोटाळ्यातील आरोपी, आमदार सुरेश जैन यांना धुळे येथील विशेष न्यायालयाने 16 दिवसांसाठी दिलेली वैद्यकीय रजा औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी रद्द केली. शारीरिक तपासणी व मुलाच्या वास्तुशांतीस हजर राहण्याचे कारण जैन यांनी पॅरोलसाठी सांगितले होते.
धुळे विशेष न्यायालयाच्या आदेशाला जळगावातील काँग्रेसचे नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी खंडपीठात आव्हान दिले होते. शारीरिक तपासणीचे कारण दाखविताना मेडिकल बोर्डाचा दाखला आणि धुळे कारागृहाच्या डॉक्टरांचे शिफारसपत्र सादर करण्यात आले नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता.