आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Jain News In Marathi, Housing Scam, Suresh Jain, Divya Marathi

जैन यांच्या तपासणीचा अहवाल सादर करा,विशेष न्यायमूर्ती कदम यांनी दिले निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना टेबल, खुर्ची देण्याची शिफारस करणार्‍या वैद्यकीय मंडळाला शुक्रवारपर्यंत तपासणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. विशेष न्या. आर.आर.कदम यांनी सोमवारी तसे निर्देश दिले.


19 मार्चला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय बोर्डासमोर जैन यांची तपासणी झाली. त्यामध्ये जैन यांना टेबल, खुर्ची देण्याची शिफारस करण्यात आल्याचा मुद्दा अँड. अकील इस्माईल यांनी न्यायालयात मांडला. त्यावर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हरकत घेतली. अहवालासोबत जैन यांची कोणती चाचणी झाली, याचे प्रमाणपत्र जोडले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. न्या. आर.आर.कदम यांनी जैन यांचा तपासणीचा अहवालासह ज्या डॉक्टरांनी अहवालावर सह्या केल्या आहेत त्यांची नावे व इतर माहिती 28 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, व जगन्नाथ वाणी यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.


प्रदीप रायसोनींना जळगावला हलवा : प्रदीप रायसोनी यांना जळगाव न्यायालयाने घरून जेवणाचा डबा देण्यास परवानगी दिली आहे. यामुळे जळगावहून धुळ्यापर्यंत डबा आणणे अडचणीचे होत आहे. तसेच रायसोनींचे नातेवाईक डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास जळगावला राहणे सोईचे होईल. न्यायालयीन कामाकाजासाठी धुळ्यात स्वखर्चाने येण्याची त्यांची तयारी आहे, असा अर्ज रायसोनी यांचे वकील अँड. प्रदीप दीक्षित यांनी दाखल केला. त्यावर जळगावचे अँड. पंकज अत्रे यांनी बाजू मांडली.


खासदार जैन यांची भेट
खासदार ईश्वरलाल जैन यांनी सुरेश जैन व गुलाबराव देवकर यांची सोमवारी न्यायालयात भेट घेतली. बराचवेळ ईश्वरालाल जैन व सुरेश जैन यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ईश्वरलाल जैन यांनी देवकर यांची भेट घेऊन ते जळगावाला रवाना झाले.