आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suresh Jain Supporters Boycott On Municipal Corporation Election In Jalagaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश जैन गटाचा मनपा निवडणुकीवर बहिष्कार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तत्कालीन नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल तसेच फुकट बस सेवाप्रकरणी पालिका आयुक्तांकडून तत्कालीन 57 नगरसेवकांना वसुलीच्या नोटिसा सोमवारी बजावण्यात आल्या. दोन्ही प्रकरणांत 61 कोटी नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे.

विरोधकांच्या दबावाखाली पालिकेने ही कारवाई केल्याचा आरोप करत आमदार सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने एक सप्टेंबर रोजी होणार्‍या मनपा निवडणुकीवरच बहिष्काराचा इशारा दिला आहे.

पालिकेतर्फे 1996 ते 2006 दरम्यान फुकट बस प्रवास योजना, पेव्हर रस्ते डांबरीकरण, वाघूर पाणीपुरवठा, घरकुल योजना राबविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी विशेष लेखा परीक्षण अहवालांचा अभ्यास करून घरकुलप्रकरणी 59 कोटी 34 लाख, तर मोफत बस सेवाप्रकरणी 2 कोटी 50 लाख रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे. घरकुल योजनेसाठी 59 कोटी रुपये कर्ज घेण्यात आले होते. या प्रकरणी प्रत्येकी 1 कोटी 16 लाख रुपये वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.