आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन समर्थकांची दिवाळी, काव्यरत्नावली चौकात दिवसभर नवचैतन्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तब्बल साडेचार वर्षांनंतर माजी अामदार जैन यांना जामीन मिळाला. त्यामुळे महापालिकेसह शहरातील जैन यांच्या समर्थकांचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये फटाके फाेडत अाणि ढाेल-ताशांच्या तालावर नाचत जामिनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात अाले. जैन हे जळगाव शहरात येणार असल्याने समर्थकांमध्ये विशेष चैतन्य निर्माण झाले अाहे. महापालिका, नेहरू चाैक, टाॅवर चाैक, नवीपेठ, स्वातंत्र्यवीर सावरकर चाैक, काेर्ट चाैक, जुने जळगाव, मेहरूण, काव्यरत्नावली चाैकात जाऊन कार्यकर्त्यांनी फटाके फाेडले. एकमेकांना पेढे भरून अानंद साजरा केला. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीदेखील चाैकाचाैकात पेढे वाटले. तसेच जळगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी जामिनाची माहिती मिळताच शहराकडे धाव घेतली. सुरेश जैन हे शनिवारी शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी समर्थक, कार्यकर्ते जय्यत तयारी करीत हाेते.
युवाशक्तीतर्फे आतीषबाजी
जैनयांना जामीन मंजूर झाल्यानंतर युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पांडे डेअरी चौक, शास्त्री टॉवर चौक, काव्यरत्नावली चौक स्वातंत्र्य चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेच्या मंगला बारी, शोभा चौधरी, नगरसेवक अमर जैन, अजय पाटील, मनसेचे नगरसेवक अनंत जोशी, सुनील पाटील, सुनील महाजन, शरद तायडे, विष्णू भंगाळे, अशाेक कावडिया, प्रदीप श्रीश्रीमाळ, जितेंद्र छाजेड, चेतन शिरसाळे, मानसिंग सोनवणे, राजकुमार अडवाणी, गणेश सोनवणे, कपिल लढ्ढा, सूरज झंवर, यश लढ्ढा, विराज कावडिया, अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, तेजस श्रीश्रीमाळ, मंजित जांगीड, राहुल चव्हाण, भूषण सोनवणे, यश श्रीश्रीमाळ, रघुनाथ राठोड शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभर फक्त जल्लाेषच
काव्य रत्नावली चाैकात राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापाैर नितीन लढ्ढा, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, सुनील महाजन, शिवसेना खान्देश विकास अाघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. टाॅवर चाैकात महापाैर नितीन लढ्ढा, राजकुुमार अडवाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ढाेल-ताशे वाजवून नृत्य केले. दुपारी १२ वाजता महापालिकेत फटाक्यांची अातषबाजी करण्यात अाली. या वेळी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, माजी उपमहापाैर सुनील महाजन, करीम सालार, श्याम साेनवणे पदाधिकारी उपस्थित हाेते. त्यानंतर रात्री टाॅवर चाैक, नवीपेठ, काव्यरत्नावली चाैकात समर्थकांनी जल्लाेष केला.
{ढाेल-ताशांवर राज्यमंत्री, महापाैर, नगरसेवक, शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी धरला ठेका
{ चौकाचौकात सकाळी ११.३० वाजेपासून ते रात्री १०.१५ पर्यंत फटाक्यांची अातषबाजी
{ कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढेवाटप करून जळगावनगरीत साजरा केला अानंदाेत्सव
माजी अामदार सुरेश जैन यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर शहरात जल्लाेष करण्यात अाला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापाैर नितीन लढ्ढा, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह शहरातील जैन यांच्या समर्थकांनी चाैकाचाैकात फटाके फाेडत एक प्रकारे दिवाळी साजरी केली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना पेढे भरवत अानंदाेत्सव साजरा केला. एवढेच नव्हे, तर अानंदाच्या भरात ढाेल-ताशांच्या तालावर मंत्री, पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला हाेता. सकाळी ११.३० वाजेपासून ते रात्री १०.१५ वाजेपर्यंत शहरात आतषबाजी सुरू होती.
काव्य रत्नावलीत दिवाळी
काव्यरत्नावलीचौकात कार्यकर्त्यांनी दिवसभर फटाके फोडून जल्लोष केला. रात्री १०.१५ वाजता समर्थकांनी कोठ्या, रॉकेट लावले होते. त्यामुळे नागरिकांना दिवाळी असल्याचा भास होत होता. तसेच चौकात एका कोपराला भव्य मंडप टाकण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...