आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Jain Takes Back His Petation From Aurangabad Bench

सुरेश जैन यांच्या तीन याचिका औरंगाबाद खंडपीठातून मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या याचिकांवर औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणा-या तिन्ही याचिका आमदार सुरेश जैन यांनी मागे घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्सीय पिठाने या याचिका रद्द ठरविल्या होत्या.

विमानतळ योजना, वाघूर योजनेत झालेल्या घोटाळ्याबाबत पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती, तरीही गुन्हा दाखल होत नसल्याने पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने पोलिसांना कृती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जैन यांच्यावर पाच गुन्हे दाखल झाले. त्याला जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.