आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Jain With 150 Officers Done Gaulani Corruption

गाेलाणी गैरव्यवहारात अडकणार सुरेश जैनांसह १५० पदाधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी एकेका आरोपीला जामीन मिळत असतानाच आता गोलाणी मार्केटच्या २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेने फिर्याद दाखल केली आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी स्वत: शहर पोलिस ठाण्यात जाऊन गोलाणी मार्केटच्या गैरव्यवहारप्रकरणी फिर्याद दाखल केली. माजी आमदार सुरेश जैन यांच्यासह सुमारे १५० जणांविरुद्ध ही फिर्याद असून यात तत्कालीन सात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आणि मक्तेदाराचाही समावेश आहे.

जळगाव नगरपालिका असताना सन १९८८ ते २००१ या कालावधीत गोलाणी मार्केटच्या बांधकामातील २०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेले कापडणीस आणि पालिकेचे विधी सल्लागार यांच्यासोबत शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी मोक्षदा पाटील, ठाण्याचे निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्याकडे २२ पानी फिर्याद दिली. शविय यात गोलाणी मार्केट घोटाळ्यासंबंधी विशेष लेखापरीक्षणाच्या अहवालाचा दस्तऐवजही सुपूर्द केला. पालिका आयुक्त स्वत: शहर पोलिस ठाण्यात आल्याचे वृत्त वा-या सारखे पसरले आणि पोलिस ठाण्याबाहेर पत्रकार, छायाचित्रकार, उपग्रह वाहिन्यांच्या प्रतिनिधींची एकच गर्दी झाली. आयुक्त सुमारे २५ ते ३० मिनिटे ठाण्यात होते. मात्र, फिर्यादीचा दस्ताऐवज सोपवून आयुक्त तडक पोलिस ठाण्याबाहेर पडले. त्यांनी कुणाशीही संवाद साधला नाही.

मक्तेदारासाठीकाय पण...
सुरेश जैन, रायसोनींवर ठपका
याप्रकरणीरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. फिर्याद मोठी असल्याने अभ्यास केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यात तत्कालीन नगराध्यक्ष सुरेशकुमार भिकमचंद जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह १९८८ ते २००१ या दरम्यान नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले सर्व पदाधिकारी, यादरम्यानचे मुख्याधिकारी, नगरसेवक मक्तेदार गोलाणी ब्रदर्स यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यासर्वांविरुद्ध भादिंव कलम १२० ब, १०९, ४०६,४०९, ४२०, ४६५, ४६७,४६८, ४७१, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
- सुरेश जैन - (१९८५ ते १९९४)
- पांडुरंग काळे - (१२ मे १९९५ ते १० मे १९९६)
- प्रदीप रायसोनी - (११ मे १९९६ ते मे १९९७)
- लता रणजित भोईटे - ( मे १९९७ ते १० नोव्हेंबर १९९७)
- सुधा पांडुरंग काळे - (११ नोव्हेंबर १९९७ ते ११ मे १९९८)
- पुष्पा प्रकाश पाटील - ( १२ मे १९९८ ते २३ नोव्हेंबर १९९८)
- सिंधू विजय कोल्हे - (२४ नोव्हेंबर १९९८ ते १० मे १९९९)
- गुलाबराव देवकर - (११ मे १९९९ ते डिसेंबर १९९९)
- चत्रभुज सोमा सोनवणे - (४ डिसेंबर १९९९ ते १६ जून २०००)
- शविचरण ढंढोरे - (१७ जून २००० ते डिसेंबर २०००)
- लक्ष्मीकांत चौधरी - (१६ डिसेंबर २००० ते २५ जून २००१)
- सदाशवि ढेकळे - (२६ जून २००१ ते १७ डिसेंबर २००१)

चौकशी करून गुन्हा नोंदवणार
गोलाणी मार्केटसंदर्भात महापालिका आयुक्तांनी तक्रार अर्ज चौकशी अहवाल दिला आहे. त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा ते दविसांत निर्णय घेण्यात येईल. -डॉ. जालिंदर सुपेकर, एसपी.

टाळाटाळ करणे दुर्दैवच
गोलाणी प्रकरणात जर पोलिसच गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असतील तर दुर्दैव म्हणावे लागेल. सर्वसामान्यांना एक आणि संशयितांना वेगळा न्याय कसा काय? असे करण्यामागे कोणाचा दबाव आहे का? -एकनाथ खडसे, पालकमंत्री.

सहा महिने चालली चौकशी
गोलाणीमार्केटच्या बांधकामात अनियमितता असल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याने ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील तत्कालीन नगरसेवक छबिलदास खडके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यात महापालिकेने नुकतेच प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले आहे. यासंदर्भात आयुक्त कापडणीस यांनी जानेवारी २०१५ रोजी लेखी आदेश काढत गोलाणी मार्केटच्या कामात अनियमितता असल्याने कामाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. यासाठी मुख्य लेखापरीक्षक, नगररचना विभागाचे सहायक संचालक शहर अभियंता यांची चौकशी समिती नेमली होती. तब्बल सहा महिन्यांच्या चौकशीनंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आयुक्तांनी फिर्याद दाखल केली आहे.

घरकुल गुन्ह्यास देखील लागले होते तीन दिवस
पालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल घोटाळ्यासंदर्भात फेब्रुवारी २००६ ला लेखी फिर्याद दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी २००६ ला पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. आताही पोलिसांकडून तक्रारीची चौकशी करून नोंद करणार असल्याचे सांगितले जात आहे.