आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयित मुलीच्या अाईने गाठले जिल्हा न्यायालय , सोनसाखळी चोरी प्रकरणी मुलगी ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अडावद येथील यात्रेतील सोनसाखळी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या आईने बुधवारी दुपारी थेट जिल्हा न्यायालय गाठून न्यायधीशांची भेट घेण्याची मागणी केली. न्यायालयाबाहेर रडत बसल्याचे पाहून मुख्य न्यायदंडाधिकारी के.एस.कुळकर्णी यांनी तिच्याकडून माहिती घेतली. आपल्या मुलीस संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे तिने सांगितले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली.

चाेपडा तालुक्यातील अडावद येथील यात्रेत साेनसाखळीचाेरांनी धुमाकूळ घातला हाेता. यात्रेतून २९ मंगलपोत लांबवल्याच्या तक्रारी समोर आल्या. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी एका अल्पवयीन मुलीसह काही संशयितांना ताब्यात घेतले होते. त्या मुलीची अाई बुधवारी अडावद पाेलिस ठाण्यात गेली. त्या वेळी पाेलिसांनी चोरी केलेल्या मुद्देमालाची तिच्याकडे मागणी केली. त्यानंतर ती महिला थेट जिल्हा न्यायालयात पाेहाेचली.
न्यायाधीश कुळकर्णी यांच्या न्यायालयाबाहेर ती रडत बसली हाेती. न्यायाधीशांची भेट घेण्याची मागणी करीत हाेती. या महिलेकडून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतल्यावर न्यायाधीशांनी दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटना कळवली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
जिल्हापेठ अडावद पोलिस, मुख्यालयातील महिला पोलिस हे न्यायालयात अाले. मात्र, पाेलिस मारतील या भीतीने त्यांच्यासाेबत जाण्यास तिने नकार दिला. महिला पाेलिस कर्मचाऱ्यांनी तिची समजूत काढल्यानंतर तिच्यासोबत असलेल्या सात लहान-लहान मुलांसोबत पोलिस गाडीत चढली.
ग्रामस्थांनी पकडून पोलिसांकडे दिले
यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चाेरीस गेले. याप्रकरणी ग्रामस्थांनीच संशयित मुलीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तिला अटक केलेली नसून, केवळ प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीसाठी तिला बोलावले होते. जिल्हा न्यायालयात गोंधळ घालणाऱ्या महिलेनेही चोरी केल्याचे ग्रामस्थांनी बघितले आहे. जयपालहिरे, सहायक पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...