आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील 23 रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पॉस मशीनमध्ये फेरफार स्वत:चाच अंगठा लावून धान्य विक्रीच्या पावत्या काढून फेरफार करणाऱ्या जळगावातील २३ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही शनिवारी करण्यात अाली. 

 

जळगावात २१ नाेव्हेंबरला २७ अधिकाऱ्यांनी एकाच वेळी १०७ रेशन दुकानांची तपासणी केली हाेती. त्यातील ३१ रेशन दुकाने बंद आढळली होती. त्यामुळे या रेशन दुकानदारांना त्यांची अनामत रक्कम जमा करणे, परवाना निलंबित अथवा रद्द करणे, अगर फौजदारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येऊ नये? अशा नोटीस देण्यात आल्या होत्या. यानंतर दुकानदारांनी आपले खुलासे सादर केले होते. त्यानंतर पुन्हा करण्यात अालेल्या तपासणीत अनेक ठिकाणी पॉस मशीन प्रणालीत दोष निर्माण करण्यासह स्वत:चे अंगठे लावून पावत्या काढण्याचे प्रकार झाल्याचे पुरवठा विभागास आढळून आले. त्यामुळे या व्यावसायिकांवर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासह अन्य २९ रेशन दुकानदारांनाही नोटीस देण्यात आल्या आहेत. याबाबत सुनावणीअंती निर्णय घेतला जाणार असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी भुसावळ शहरातील १० रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात अाले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...