आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलावामध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ कायम, मृतदेहाची ओळख पटेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रक्षाबंधनाच्या दिवशी मेहरूण तलावात आढळून आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी करण्यात आले. दरम्यान, मृताची ओळख पटलेली नसल्यामुळे शनिवारपर्यंत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातच ठेवला जाणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

२५ ते ३० वयोगटातील हा तरुण असून त्याच्या उजव्या हातात राखी बांधलेली आहे. त्याने तलावाच्या काठावर कपडे, चप्पल काढून ठेवली होती. तसेच दोन दिवसांपूर्वीच ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण त्याचा मृतदेह गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळला होता. पाण्यात ३० तासांपेक्षा जास्त वेळ राहिल्यानंतर मृतदेह पाण्यावर तरंगतो म्हणून पोलिसांनी असा अंदाज लावला. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी परिसरात मिसिंग असलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना बोलावून चौकशी केली. अनोळखी युवकाचे कपडे फोटो दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...