आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीचा संशयास्पद मृत्यू, चाैघे ताब्यात, माेहाडीत तणाव, विहिरीत अाढळला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - माेहाडी उपनगरातील महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका विहिरीत अाढळून अाला. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
जिल्हा रुग्णालयातही तणाव कायम हाेता. या प्रकरणी पाेलिसांनी संशयावरून चाैघांना ताब्यात घेतले. युवती काल मंगळवारपासून घरातून बेपत्ता हाेती. युवतीचा मृत्यू संशयास्पद अाहे. या प्रकरणी काल मंगळवारी माेहाडी पाेलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. दरम्यान, या घटनेमुळे गावात काहीसा तणाव निर्माण झाला हाेता. मात्र, पाेलिसांनी समजूत काढत दाेषींविरुद्ध कारवाई करण्याचे अाश्वासन दिले.
माेहाडी उपनगरातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले विठ्ठल गावडे यांची लहान मुलगी निकिता ही जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात बारावी सायन्सला शिकत हाेती. ती मंगळवारी सकाळी खासगी क्लासला गेली. तेव्हापासून घरी परतली नाही. तिचा दिवसभर शाेध घेऊनही ती कुठेही अाढळून अाली नाही. या प्रकरणी तिच्या वडिलांनी माेहाडी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुलीचे अपहरण झाल्याची नाेंद घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. दरम्यान, नातेवाईक इतर मित्रमंडळीही तिचा शाेध घेत हाेते. बुधवारी दुपारी काही जणांना तिची दुचाकी परिसरातील विलास शिंदे यांच्या घरापासून काही अंतरावर दिसली. त्यामुळे ती तिथेच कुठेतरी असल्याचा संशय वाढला. त्यातून अधिक शाेध घेण्यात अाला. त्यात मुलीचे मेहुणे यांनी स्वत: विलास शिंदे यांच्या घराच्यापरिसरात असलेल्या विहिरीत उडी मारून शाेध घेण्याचा प्रयत्न केला. विहिरीच्या तळाशी मृतदेह अाढळून अाला.
नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. ताेपर्यंत पाेलिसही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली हाेती. तिथून मृतदेह हिरे मेडिकल काॅलेजला नेण्यात अाला. तेथील डाॅक्टरांनी तपासणी करून निकिता मृत झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर जुन्या जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात तरुणीचा मृतदेह अाणण्यात अाला. या ठिकाणीही शिवसेनेचे पदाधिकारी, गावातील नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त लावण्यात अाला. नातेवाइकांनी दाेषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.
त्या वेळी उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी नातेवाइकांची समजून घालून शवविच्छेदन झाल्यानंतर नेमके काय झाले हे स्पष्ट हाेईल. शवविच्छेदनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करण्यात अाले. रात्री अाठ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू हाेती. ताेपर्यंत शवविच्छेदनगृहाजवळ गर्दी कायम हाेती. या ठिकाणी शिवसेनेचे शरद पाटील, हिलाल माळी, सतीश महाले यांनी उपस्थित राहून सर्वांना शांत राहण्याचे पाेलिसांना सहकार्य करण्याचे अावाहन केले. दरम्यान, तरुणीच्या मृतदेहावर उद्या गुरुवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार अाहेत.


-या प्रकरणी पाेलिसांकडून काेणाचीही गय केली जाणार नाही. याेग्य ती कारवाई करावी. नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयितांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे. तसेच संबंधित युवतीच्या शवविच्छेदनातून काही नमुने घेण्यात अाले अाहेत. ते तपासणीसाठी मंुबई येथील प्रयाेगशाळेत पाठविले जातील. त्यातून सत्य बाहेर येईलच. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-हिंमत जाधव, उपविभागीय पाेलिस अधिकारी

इनकॅमेरा शवविच्छेदन
दरम्यान,तरुणीचा मृत्यू संशयास्पद असल्याने पाेलिसांकडून तिचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्यानुसार पाच पुरुष, एक महिला डाॅक्टर, उपविभागीय पाेलिस अधिकारी, संबंधित तरुणीच्या नातेवाईक असलेल्या दाेन महिलांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात अाले. जवळपास दाेन तास शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू हाेती. अहवाल अाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

माेबाइलवरून तपास
या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पाेलिसांकडून संबंधित तरुणीच्या माेबाइलचे लाेकेशन तपासले. तसेच काॅल रेकाॅर्डही संबंधित कंपनीकडून प्राप्त करून त्यानुसार तपास सुरू केला. तिला मंगळवारी पहाटे एक काॅल अाल्याचे लक्षात अाले. त्याआधारे चाैघाना ताब्यात घेतले असून, ते अल्पवयीन अाहेत. त्यामुळे त्यांचे नावे देण्यास पाेलिसांकडून नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...