आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभारवाडा परिसरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण परिसरातील कुंभारवाड्यातील युवकाचा रविवारी सायंकाळी वाजता एमअायडीसी परिसरात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या खिशात विषारी पावडरची पुडी सापडली अाहे. त्याचे परिसरातील एका मुलीशी प्रेमसंबध हाेते. तिच्याच नातेवाइकांनी त्याची हत्या केल्याचा अाराेप मृत तरुणाच्या वडिलांनी केला अाहे. 
 
मिलिंंद शालीक वानखेडे (वय २३) असे मृत तरूणाचे नाव असून तो एमअायडीसीत स्पेक्ट्रम कंपनीत कामाला हाेता. त्याचे वडील शालीक वानखेडे हे रिक्षाचालक अाहेत. मिलिंदची मन:स्थिती गेल्या पाच ते सहा दिवसांपासून खराब हाेती. रविवारी दुपारी वाजेच्या सुमारास ताे कंपनीच्या ठेकेदाराचा जेवणाचा डबा घेण्यासाठी अाला हाेता. त्यावेळी त्याच्या अाईला भेटून ताे परत गेला. त्यानंतर ताे काेणाशी बाेलला नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. 
पाेलिसांनामिळालेली माहिती अशी : सायंकाळीवाजेच्या सुमारास एमअायडीसीतील बी सेक्टरमधील एका चहाच्या टपरीवर मिलिंद थांबला. त्या ठिकाणी त्याने टपरीचालकाकडे ग्लासात पाणी मागितले. त्यानंतर त्याने खिशात ठेवलेल्या पुडीतून एका राखाडी रंगाची पावडर ग्लासात टाकून ताे पाणी प्यायला. त्या ठिकाणाहून ताे निघून गेला. 

सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एमअायडीसी पाेलिस ठाण्यात स्टारडन कंपनी समाेर एक युवक बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक राेहन खंडागळे, शरद भालेराव यांनी घटनास्थळावर जाऊन बघितले. त्यांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणाचे खिसे तपासले असता, त्यात एक पुडी सापडली. यात राखाडी रंगाची पावडर हाेती. एक माेबाइल पाेलिसांना सापडला. त्या माेबाइलमधील क्रमांकावरून फाेन केल्यानंतर त्याची अाेळख पटली. त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. मिलिंदच्या अात्महत्येची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील, भाऊ चेतन हे सिव्हिलमध्ये पाेहाेचले. मात्र, त्या ठिकाणी ताे मृत झाल्याचे कळाल्यावर त्यांनी अाक्राेश केला. 

^मिलिंदचे ज्यामुलीशी प्रेमसंबंध हाेते. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वीच मिलिंदला ठार मारण्याची धमकी दिली हाेती. त्यांनीच त्याचा घातपात केला अाहे. ताे अात्महत्या करुच शकत नाही. शालिकवानखेडे, मृत मिलिंदचे वडील 
 
गुन्हे दाखल करण्याची मागणी 
एमअायडीसी पाेलिस संबंधितांवर गुन्हे दाखल करीत नसल्याचा अाराेप करून मिलिंदच्या नातेवाइकांनी रविवारी रात्री ११.३० वाजता थेट जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना काेणीही अधिकारी भेटला नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईक परत गेले. 

काय हाेती राखाडी रंगाची विषारी पावडर? 
एमअायडीसीत जाऊन मिलिंदने एक राखाडी रंगाची पावडर पाण्यात टाकली होती. ती पावडर नेमकी काय अाहे. त्याची तपासणी करण्यासाठी पाेलिसांनी पावडर ताब्यात घेतली असून ती फाॅरेन्सिक लॅबला पाठवणार असल्याची माहिती पाेलिस उपनिरीक्षक राेहन खंडागळे यांनी दिली. 

दाेषींवर कारवाई करा 
मिलिंदचेपरिसरातील युवतीशी प्रेमसंबंध हाेते. तिच्या नातेवाइकांनी दाेन महिन्यांपूर्वी मिलिंदला मारहाण केली हाेती. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे मिलिंदचे वडील शालिक वानखेडे यांनी सांगितले. मुलीच्या नातेवाइकांनीच मिलिंंदला मारल्याचा अाराेप वानखेडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला. तसेच दाेषींवर गुन्हे दाखल हाेत नाही ताे पर्यंत मिलिंदचा मृतदेह उचलणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...