आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरानुभूती’ संगीत महोत्सवातील ठुमरी गायनाने रसिक मंत्रमुग्ध!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अनूभूति निवासी स्कूलचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलतर्फे आयोजित ‘स्वरानुभूती’ संगीत महोत्सवात लखनऊ येथील प्रसिद्ध ठुमरी गायक प्रवीण कश्यप यांनी अप्रतिम कलाविष्कार सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनियमवादक निखिल क्षीरसागर भुवनेश्वर येथील आकाश बिश्वास यांची साथ लाभली. तर अहमदाबादचे पंडित पृथ्वीराज मिश्रा, हार्मोनियमवादक अमृतेश शांडिल्य भुवनेश्वर येथील आकाश बिश्वास यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत आणली.
 
बाबा खानेरे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव, आकाश विश्वास यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शुक्रवारी दिल्लीचे प्रसिद्ध गायक पंडित आशिष नारायण त्रिपाठी यांचा कार्यक्रम होईल. याचबरोबर जबलपूरच्या विदुषी निलांगी कलंत्रे हे कथ्थक नृत्य सादर करतील. त्यांना अमृतेश शांडिल्य यांची तबला संगत लाभेल. 
 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते सुप्रतिक सेन गुप्ता (कलकत्ता) यांना लयानुभूती, पंडित पृथ्वीराज मिश्रा (अहमदाबाद) यांचा तालानुभूती सन्मान देऊन गौरवले. तसेच प्रख्यात वाद्यनिर्माते भारत काकडे (पुणे) यांचादेखील सन्मान करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या हस्ते लखनऊ येथील प्रसिद्ध ठुमरी गायक प्रवीण कश्यप यांना अनुभूतीस्कूलचे कला शिक्षक तन्मय कुंडू यांना स्वरानुभूतीने गौरवण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...