आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाफना नेत्रपेढीला ‘स्वॅग’ पुरस्कार, मुंबईच्या सीएसआर जनरल संस्थेकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबईच्या सीएसआर जनरल या संस्थेतर्फे जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीला ‘स्वॅग’ अर्थात सोशल वेलफेअर अॅण्ड ग्रोथ या राष्ट्रीय द्वितीय पुरस्काराने मुंबई येथील लीला या हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात गौरवण्यात आले.
नेत्रपेढीच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांपासून नेत्रदान, जनजागृतीची चळवळ सुरू आहे. या कार्याची दखल घेऊन पहिल्या तीन संस्थांमध्ये स्थान मिळाले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. रवी हिराणी, सचिन चोरडिया, राजश्री डोल्हारे, कुणाल महाजन समाधान चौधरी उपस्थित होते. यासाठी रतनलाल बाफना, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर सचिव रत्नाकर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख शरद कोत्तावार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...