आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वॅपिंगचे व्यवहार ६० टक्के वाढले,अनेक दुकानदारांकडे स्वॅपिंग सुविधा कार्यान्वित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - १०००५०० रुपयांच्या नोटबंदीमुळे बाजारात १०० ५० रुपयांच्या नोटा मिळवण्यासाठी नागरिकांना दमछाक करावी लागत अाहे. त्यामुळे नागरिकांचा कल स्वॅपिंगकडे वाढला असून गेल्या १२ दिवसांत शॉपी, मॉल, मेडिकल, इतर दुकानांमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड स्वॅप करून खरेदी करण्याचे व्यवहार सुमारे ६० टक्क्यांनी वाढले आहेत. शहरात अनेक दुकानदारांनी ४-५ दिवसांत नवीन स्वॅपिंग यंत्रणा बसवून एटीएम कार्डद्वारे पैसे स्वीकारणे सुरू केले आहे.
नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वच क्षेत्रांवर चांगलाच परिणाम झाला आहे. काळा पैसा, बनावट नोटा, दहशतवाद्यांकडून वापरले जाणारे चलन आदींवर अंकुश येणार असल्याचे दावे शासनाकडून होत असले तरी सर्वसामान्यांना होणारा त्रास बेदखल करण्यासारखा नाही. सकाळपासून बँक, एटीएमच्या रांगेत उभे राहून नागरिक वैतागले आहेत. परिणामी ऑनलाइन बँकिंगकडे आता सर्वांचा कल वाढत आहे. नेट बँकिंगद्वारे एनएफटीचा पर्याय निवडून रक्कम खात्यात वर्ग केली जात आहे. तसेच स्वॅपिंग मशीनचा वापरदेखील मोठ्याप्रमाणात वाढत आहे. शहरातील अनेक मोठे बियर बार, वाइन शॉपमध्ये याचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. ज्या बारमध्ये स्वाइप मशीन आहेत, तेथे ग्राहकांची गर्दी आठवडाभरापासून वाढली आहे. तसेच मेडिकल, माॅल, माेठे किराणा दुकानदार, माेबाइल विक्रेते इतर व्यापाऱ्यांनी देखील स्वॅपिंग सुविधा कार्यान्वित केली.

स्वॅपिंगमशीन खरेदी वाढली
गेल्याते दिवसांत अनेक व्यापारी, दुकानदारांनी स्वॅपिंग मशीन खरेदी केले आहे. यात मेडिकल, कापड विक्रेते तसेच किराणा दुकानदारांचा समावेश आहे. खिशात केवळ एटीएम कार्ड सोबत नेले तरी काही दुकानांमधून माल मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये शहरात अशा स्वॅपिंग यंत्राचा वापर वाढणार आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी नोंदणीनंतर चार ते पाच दिवसांत स्वाइप यंत्र उपलब्ध करून देण्याचे शासनाने ठरवले आहे. व्यावसायिकांचे खाते नसेल तर तातडीने खाते सुरू करून दिले जात आहे. नोंदणी करून चार दिवसांत यंत्र उपलब्ध करून दिले जात आहेत. भविष्याच्या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कॅश वाटप सुरू
^नाेटबंदीच्याअादेशापूर्वीएकूण विक्रीच्या १२ टक्के व्यवहार हे अाॅनलाइन पमेंट हाेत हाेता. अाता हे प्रमाण ६० टक्क्यांवर पाेहाेचले अाहे. स्वॅपिंग मशीनद्वारे रविवारी ८० जणांना दाेन-दाेन हजार रुपयांचे वाटप करण्यात अाले. या मशीनमुळे नागरिकांची साेय हाेत अाहे, त्याचबराेबर अाम्हाला बंॅकेत जाऊन पैसे भरायची गरज नाही. अामचे पैसे परस्पर बंॅकेत भरले जात अाहेत. अाॅनलाइन व्यवहारांसाठी स्थानिक बंॅकांनी पुढाकार घेतल्यास राेकड उपलब्धतेची समस्या दूर हाेईल. अनिलकांकरिया, व्यापारी
बातम्या आणखी आहेत...