आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाफनाला 20पर्यंत कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 20 राज्यांत नागरिकांची फसवणूक करणार्‍या स्वप्निल विनोद बाफना या ठगाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्याच्यासोबत त्याचे वडील विनोद उत्तमचंद बाफना आणि मुकेश किशोर बोहरा यांचाही या गुन्ह्यात सहभाग आहे; मात्र हे दोघे अद्याप फरार आहेत. स्वप्निलच्या विरोधात एमआयडीसी ठाण्यात 14 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘मानराज मोटर्सच्या वर, एमआयडीसी’ या पत्त्यावर ‘फंट्रीन न्यूट्रीशियन इंडिया’ नावाने बनावट कंपनी स्थापन करून स्वप्निल बाफना, त्याचे वडील विनोद बाफना आणि मुकेश बोहरा या तिघांनी भांडवलापोटी व्यावसायिकांकडून पैसे गोळा करून पोबारा केला होता. याप्रकरणी शिव कॉलनीतील जितेंद्र जैन यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जैन यांच्याकडून या तिघांनी भांडवलापोटी 14 लाख घेतले. तसेच जास्त भांडवल गुंतवल्यास 5 टक्के कमिशन देण्याचे आमिषही जैन यांना दिले होते. चॉकलेट तयार करणारी कंपनी असल्याचे भासवून तिघांनी जैन यांची फसवणूक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक डी.डी.इंगोले करत आहेत.