आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर मदतीसाठी ‘स्वरक्षा अँप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रस्ते अपघातातील जखमींना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतात. मदत न मिळाल्याच्या कारणाहून होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. महामार्ग पोलिसांनी स्वरक्षा नावाने अँप्लिकेशन तयार करून अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

मुंबईच्या एनर्जी लॅब या संस्थेच्या मदतीने हे अँप्लिकेशन तयार झाले आहे. लॅबचे नयन गोयंका, संस्कार झंवर अणि नितीन गुप्ता यांच्या सहकार्य आणि संशोधनातून अँप्लिकेशन तयार झाले आहे. गोल्डन अवर्समध्ये अपघातग्रस्तांना मदत मिळण्यासाठी या अँप्लिकेशनचा फायदा होणार आहे. यामुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणावर थोड्या प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

नागरिकांनी असा करावा सॉफ्टवेअरचा वापर
नागरिकांनी अँण्ड्रॉइड फोनवर सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचे आहे. आपण कधीही अपघात पाहिल्यास हे अँप्लिकेशन ओपन करायचे. त्यानंतर येणार्‍या दोन सूचनांप्रमाणे कळ दाबायची. त्याच क्षणी अपघाताची माहिती नजीकच्या महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला मिळेल. माहिती मिळाल्यानंतर 2 ते 3 मिनिटात आपल्या मोबाइलचे लोकेशन पोलिसांना कळते. त्यानंतर शक्य तेवढय़ा कमी वेळेत स्थानिक पेालिस ठाणे, महामार्ग पोलिस, रुग्णवाहिका, सरकारी हॉस्पिटल यांना कळविले जाते.

अशा आहेत स्वरक्षा अँप्लिकेशनमधील विविध सुविधा
- स्वरक्षा अँण्ड्रॉइड बेस अँप्स असून गुगल प्लेमध्ये विनामूल्य उपलब्ध होते
- डाऊनलोड करणार्‍या व्यक्तीचे नाव, पत्ता, ब्लडग्रुप, नातेवाइकांचा सपंर्क तसेच महामार्ग पोलिसांचा नियंत्रयण कक्षाचा हेल्पलाईन नंबर सेव्ह केला जातो.
- एसएमएसने माहिती पाठवल्यास त्यास जीपीएस लोकेशन असते
- महामार्ग पोलिसांना संदेश मिळाल्यासनंतर कंट्रोल रुमचा अधिकारी हा संदेशाच्या लोकेशनवरून नजीकच्या यंत्रणेला माहिती कळवतीत, त्यानुसार मदत होईल
- अपघातानंतर तत्काळ रुग्णांवर उपचार व हाताळणी करणे सोपे होते.
- अँपमध्ये राज्यातील सर्व महामार्गांवर असलेल्या पोलिसांच्या टॅपची माहिती आहे. तसेच त्या-त्या टॅपच्या नजीकचे रुग्णालय, गॅरेज, रुग्णवाहिका, खासगी रुग्णालयांची माहिती आहे.