आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वेटर विक्रीची दुकाने अखेर मनपा हलवणार, विक्रेत्यांच्या सोयीसाठी पर्यायी जागेचा घेणार शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवतीर्थ मैदानालगत असलेल्या जागेवर स्वेटर विक्रीच्या दुकानांना दिलेली परवानगी परत घेऊन त्यांना हलवण्याचा निर्णय पालिकेने मंगळवारी घेतला. अतिक्रमण हटाव कारवाई केल्यानंतर आपलाच निर्णय फिरवून पालिकेने ही परवानगी दिली होती. दरम्यान, या संदर्भात 'दिव्य मराठी'ने १६ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून या विषयावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर मंगळवारी पालिकेने ही दुकाने हटवण्याचा निर्णय घेतला.

शहरातील प्रमुख ११ रस्त्यांवरील अतिक्रमणाचे नियाेजन करणाऱ्या महापालिका प्रशासनाने साेईनुसार अापले निर्णय फिरवल्याचे यात जाणवत होते. पूर्वी याच जागेवर असलेल्या फूलविक्रेत्यांना अतिक्रमण विभागाने हटवले होते. हा मुख्य रस्ता असल्यामुळे वाहतुकीस खोळंबा होऊ नये, म्हणून येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. या वेळी प्रचंड तणावही निर्माण झाला हाेता. एका महिलेने तर चक्क मुलीला ट्रकखाली टाकण्याची धमकी दिली हाेती. पण, मोठा फौजफाटा वापरून पालिकेने ही जागा रिकामी केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात याच जागेवर मनपाने स्वेटर विक्रेत्यांना दाेन महिन्यांसाठी अतिक्रमण करण्याची जणू लेखी परवानगी दिलेली होती. त्यापोटी त्यांच्याकडून साडेचार हजार रुपयांची फी घेण्यात आली होती. ही फी आता परत दिली जाणार असून स्वेटर विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा शोधण्यात येणार आहे.

अन्याय होऊ नये म्हणून हटवण्याचा निर्णय
पूर्वी येथील छोटे अतिक्रमणधारकांना हटवून रस्ता मोकळा करण्यात आला होता. मात्र, नंतर अनावधाने ही जागा स्वेटर विक्रेत्यांना देण्यात आली. छोट्या विक्रेत्यांवर अन्याय केल्यासारखे झाल्यामुळे आता स्वेटर विक्रेत्यांची फी परत करून जागा रिकामी करून घेण्यात येणार आहे. जीवनसोनवणे, आयुक्त
बातम्या आणखी आहेत...