आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांचे पगार मिळाले; कर्मचाऱ्यांचे आंदाेलन मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले सफाई कामगारांचे आंदोलन मंगळवारी एप्रिल महिन्याचा पगार अदा केल्याचे जाहीर करताच मागे घेण्यात आले. तीन दिवसांपासून पालिकेच्या गेटसमोर कामगार ठिय्या मांडून होते. दरम्यान, हाती एकदम दाेन महिन्यांचे वेतन पडल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील साफसफाई बुधवारपासून नियमितपणे सुरू होणार असल्याने नागरिकांचीही समस्या सुटणार आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासूनचे वेतन पेन्शन अदा करण्यात आले नव्हते. सलग तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले होते. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष अजय घेंगट यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. त्यात महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला होता. ऊन-पावसाची पर्वा करता आंदोलन सुरू होते. शनिवारी मार्च महिन्याचे वेतन सोमवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते.
मात्र, आणखी एका महिन्याचे वेतन मिळावे, या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. त्यामुळे मंगळवारी एप्रिल महिन्याचे वेतन पेन्शन अदा केल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी आंदोलनकर्त्या महिला कामगारांनी थेट सतरा मजलीच्या पोर्चमध्ये तळ ठोकला होता. मात्र, दुपारनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच या वेळी आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन वेगवेगळ्या ११ मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली. लवकरच मे महिन्याचे वेतन अदा करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार असल्याचे सांगण्यात आले.
मे महिन्याचाही पगार होणार
गेल्या तीन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना तीन दिवसाच्या अंतराने दोन महिन्यांचा पगार अदा करण्यात आला. आता प्रशासन मे महिन्याचा पगार कशा पद्धतीने देता येईल, यादृष्टीने विचार करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...