आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sweetness Lasting, Reading Medium Change F.M.Shinde

गोडी कायम, वाचनाचे माध्यम बदललेय - फ. मुं. शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाचन संस्कृती टिकेल की नाही याविषयी खूपच काळजी केली जाते. अलीकडे वाचनाचे माध्यम बदलले आहे. पण वाचनाची गोडी कमी झालेली नाही. हे दिवसेंदिवस पुस्तकांच्या विक्रीत होत असलेल्या वाढीच्या आकडेवारीवरून दिसून येईल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.
फ. मुं. म्हणाले, यंदाची निवडणूक केव्हा पार पडली याचा फारसा गाजावाजा झाला नाही. विशिष्ट चौकटीत राहून बिनविरोध निवड करणे शक्य आहे. पण औपचारिकता म्हणून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडावीच लागते. निवडणुकीपूर्वी प्रत्येक साहित्यिक मतदारांना स्वलिखित एक पानभर भावनिक पत्र लिहिले होते. त्यामुळे भेदाभेद न मानता मतदारांनी निवडून दिले. संमेलनांचा आवाका फार मोठा नसावा. साधेपणातही संमेलने होऊ शकतात. यासाठी साहित्यिकांनीच संमेलने भरवली पाहिजेत. त्यासाठी राजकीय आश्रयाची गरज नाही. जसे विठुरायाच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने जातात. त्यांना विठ्ठलाकडून निमंत्रण थोडी दिले जाते. त्या त्या ठिकाणी होणारे साहित्य हेदेखील तेथील तीर्थक्षेत्रच असते. त्यासाठी साहित्यिकांना निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. मराठी माणसांच्या संस्कृतीची, विचारांची आदानप्रदान होणे हा यामागील उद्देश असतो. तो सफल झाला म्हणजे संपले, असे शिंदे म्हणाले.
बोलीभाषेतले साहित्य रुचते अनुवाद केलेले लेखन, धार्मिक, उपयुक्त ज्ञान देणारे साहित्य आणि शेतीविषयक पुस्तकांना सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. साहित्य बोलीभाषेतले असले तरी ते मराठी साहित्यातच मोडते. आपलं जगणं आणि आपल्या जगण्यातली भाषा साहित्यात आली पाहिजे.