आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचा धसका: मनपा प्रशासन खडबडून जागे चार हजार लोकांची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डेंग्यूरोगाचा ताप कमी होताच आता स्वाइन फ्लूने डोकेवर काढले आहे. या तापामुळे चैत्रबन कॉलनीतील एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे पालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. बुधवारी चैत्रबन कॉलनीतील सुमारे चार हजार लोकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. आणि त्यापैकी नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहे.

हवामानातील अचानक बदल, दमट, कुंद वातावरण यामुळे स्वाइन फ्लूने डोकेवर काढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज असून औषधांचा पुरेसा साठा असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. योग्य काळजी औषधोपचार केल्यास हा ताप आटोक्यात येतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.के. शेळके यांनी स्पष्ट केेले.

चैत्रबन कॉलनीतील श्रीकांत विधाते (वय ५४) यांचा स्वाइन फ्लूमुळे मुंबईत २३ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्याचे वृत्त प्रकाशित होताच पालिकेने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली. त्यानुसार बुधवारी चैत्रबन कॉलनीतील १११८ घरांतील ४४६५ जणांचे नमुने घेतले. त्यातील नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या साठी महापालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले असून ते रुग्णांची तपासणी करीत आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे
स्वाइनफ्लूचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. रुग्णाच्या ३० फुटांपर्यंत या आजाराचे जंतू पसरू शकतात. त्यामुळे थंडी वाजून ताप येणे, सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, खोकला येणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नखे काळी- निळी पडणे, लहान मुलांची त्वचा निळी पडणे, शाैच पातळ होणे, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, गुदमरणे, चिडचिड होणे आदी लक्षणे दिसून येतात.

अशी होते लागण
स्वाइनफ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या नाकावाटे बाहेर पडणारा कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो हात जिथे स्पर्श करेल त्या ठिकाणी संसर्ग होतो. किंवा खोकलण्याने किंवा शिंकण्याने इतरांना श्वसनाद्वारे त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांच्या जवळ जाऊ नये.

वृद्ध,बालकांना धोका
पाचवर्षांच्या आतील मुलांना, ६५ वर्षांवरील वृद्धांना, गरोदर मातांना, श्वसनाच्या रुग्णांना, किडनीच्या रुग्णांना, एचआयव्ही बाधित रुग्णांना स्वाइन फ्लूची शक्यता अधिक असते.

लागण झाल्यास धोका
मोठ्याकालावधीसाठी फुप्फुसाचे विकार उद््भवतात, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे विकार मेंदूशी संबंधित विकार तीव्रतेने उद््भवतात. अशा रुग्णास योग्य वेळी उपचार मिळाल्यास असा व्यक्ती दगावतात.

हे करणे टाळा
हस्तांदाेलनकरणे, अलिंगन देणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे, धूम्रपान, गर्दीत जाणे, स्वाइन फ्लू रुग्णांजवळ थांबणे टाळा.

अशी घ्या काळजी
हातनियमित साबणाने धुवावेत, िलंबू, आवळा, मोसंबी, संत्री, िहरव्या पालेभाज्या, सी िव्हटॅमीन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा. खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. भरपूर पाणी प्यावे पुरेशी झाेप घ्यावी.

जिल्‍हा रुग्णालय सज्ज
सिव्हिलमध्येसध्या टॅमी फ्लूच्या गोळ्या, आेसेल्टा िमवीरच्या ९३०, ३० एमजीच्या ११३० गोळ्या आणि आ ैषधांच्या ४८ बाटल्या, व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियाचे २४ कीट, सेफ्टी गाऊनचे १२६ कीट, एन ९५चे २८ मास्क उपलब्ध आहेत. तसेच स्वतंत्र वॉर्डची तयारी सुरू आहे. यात एक सर्जन, एक फिजिशियन, स्टाफ, एक रुग्णवाहिका, ऑक्सिजन िसलिंडर, पल्सआेरी मीटर, इलेक्ट्रिक फूड सक्शन मशीन, व्हेंटिलेटर, ड्रेन स्वॅप राहील.

-स्वाइन फ्लूचा विषाणू हा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात आणि अचानक बदल झालेल्या तापमानात प्रभावीपणे पसरतो. डॉ.किरणपाटील