आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या २३ विक्रेत्यांकडे उपलब्ध, रुग्णालयामध्ये स्वाइन फ्लूचा कक्ष तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्वाइन फ्लूमुळे २३ जानेवारीला मुंबई येथे शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्‍हा रुग्णालय महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान, जिल्‍हा सामान्य रुग्णालयात तातडीने स्वाइन फ्लूचा स्वतंत्र वार्ड सुरू करून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शहरात २३ तर जिल्‍ह्यातील ४३ औषध विक्रेत्यांकडे ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, काही समस्या उद््भवल्यास त्वरित िसव्हिलमध्ये संपर्क साधावा, असे जिल

हा शल्यचिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांनी ‘दिव्‍य मराठी’शी बोलताना सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला वैद्यकीय कक्ष १३ च्या बाजूला असलेल्या खोलीत स्वाइन फ्लूच्या रुग्णासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, यात सहा बेड, ऑक्सिजन सिलिंडर, पल्स ओरी मीटर, इलेक्ट्रिक फूड सक्शन मशीन, व्हेंटिलेटर आणि ड्रेन स्वॅप ठेवण्यात आले आहे. तसेच या वॉर्डासाठी सर्जन, फिजिशियन, स्टाफ आणि स्वतंत्र रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातमुबलक औषधे उपलब्ध
जिल्ह्यात६६ औषध विक्रेत्यांना ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या विकण्याचा परवाना देण्यात आला आहे. त्यातील शहरात २३ तर जिल्‍ह्यात ४२ विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे खासगी मेडिकल दुकानांवरही या गोळ्या सहज उपलब्ध होऊ शकतात. शिवाय नियमित तपासणीत या गोळ्यांचा साठा तपासला जातो आणि साथ आल्यानंतर गोळ्या ठेवण्यासाठी सूचना केल्या जात असल्याचे, अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भूषण पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सध्या ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या मुबलक उपलब्ध आहेत. तसेच ओसेल्टा मिविरच्या ९३०, ३० एमजीच्या ११३० गोळ्या आणि औषधाच्या ४८ बाटल्या, व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियाचे २४ किट, सेफ्टी गाऊनचे १२६ किट, एन ९५चे २८ मास्क उपलब्ध आहे.

१२ वर्षीय बालकास स्वाइन फ्लूचा संशय
ईश्वरकाॅलनीतल १२ वर्षीय बालकास स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. तो काही दिवसांपूर्वी त्याच्या नातेवाइकांकडे भरूच (गुजरात) येथे गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला त्रास सुरू झाला. गेल्या १२ दिवसांपासून त्याला त्रास होत असून त्याच्यावर डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्याकडे उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्याला स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याच्या थुंकीचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.