आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू परततोय ! शहरात २५ रुग्णांमध्ये आढळली लक्षणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लू सदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात २० दिवसांत तब्बल २५ रुग्णांना स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. खासगी रुग्णालयात टॅमी फ्लूच्या गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याने बऱ्याच रुग्णांच्या जीवाचा धोका टळला आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनतज्ज्ञ डॉक्टरांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले आहे.

जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालय पॅथॉलॉजीमध्ये ते २३ सप्टेंबर दरम्यान ३० रुग्णांवर उपचार रक्ताची तपासणी करण्यात आली. यात तब्बल २५ रुग्णाना स्वाइन फ्लू सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. या रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू परतल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मंगळवारी जळगावात भुसावळातील सेना पोलिस दलातील जवान हरीशकुमार मुरलीधर बऱ्हाटे (वय ४९) यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाता सतर्क रहावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. तसेच बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने स्वाइन फ्लू कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. याठिकाणी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्वाईन फ्लूसाठी लागणाऱ्या औषधीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नाशिक येथ‌ील कुंभमेळ्यामुळेही प्रसार
नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी देश, परदेशातून लाखो भाविक आले होते. या गर्दीमुळे अनेकांना संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागले आहे. स्वच्छतेचा अभाव जाणवल्यामुळे तेथूनही विषाणूंचा प्रसार वाढला. राज्यभरातून, रेल्वे, बसेसने लोकांनी गर्दी करून प्रवास केला. या गर्दीमुळेही स्वाइनचा प्रसार झाल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्टेप आणि मध्ये टॅमी फ्लू, अॅमी फ्लूच्या गोळ्यांनी उपचार केला जाऊ शकतो. मात्र, स्टेप मध्ये रुग्णांची प्रकृती अधिकच चिंताजनक होते. त्यामुळे अशी लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचार करून घेणे आवश्यक आहे.

स्टेप : चारते पाच दिवसांपेक्षा जास्त काळ सर्दी असणे, सतत ताप आळस, खोकला येणे, पोटात दुखणे, गडगड होणे.
स्टेप: शरीरातीलसर्व सांधे सतत दुखणे, जीव घाबरणे, उलटी होणे, डायरिया होणे.
स्टेप: अचानकचक्कर येऊन बेशुद्ध पडणे.

स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घर परिसर, कॉलन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचू देऊ नका. कारण कचरा सडल्यामुळे त्यात उंदीर, मांजर, मोकाट कुत्री गर्दी करतात. काहीवेळा हे प्राणी मृतावस्थेत पडून असतात. त्यांच्या मृत शरीरातून विषाणू बाहेर पडतात. हे विषाणू स्वाइन फ्लू होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. याचप्रमाणे घरातील पाळीव प्राणी, पक्षी मेल्यानंतर चार ते सहा तासांपर्यंत त्यांच्या संपर्कात कुणीही जाऊ नये. काळजीपूर्वक (तोंडाला मास्क लावून) त्यांचा मृतदेह जमिनीत पुरावा. पाण्याची पाइप लाइन जर गळकी असेल आणि त्यामुळे घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असेल तर त्यापासूनही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शक्यताे पाणी उकळून थंड करून प्यावे. सर्दी, अंगदुखी, खोकला यासारखा त्रास होत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. त्यामुळे इतरांनाही संसर्ग होऊ शकतो.

ताप, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ
सध्या ताप, सर्दी, अंगदुखीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सर्वच रुग्णांना स्वाइन फ्लू असेल असे नाही. व्हायरल इन्फेक्शनही असते. मात्र, आम्ही दक्षता घेत आहोत. स्वाइन फ्लू कक्ष कार्यान्वित केला आहे. तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही उपलब्ध आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. डॉ.किरण पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक

शासनपातळीवर सर्वेक्षण सुरू
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शासन पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. स्वच्छता राखणेही महत्त्वाचे आहे. आतापर्यंत ५० हजार पेक्षा जास्त लोकांवर औषधोपचार करण्यात आला आहे. प्रदीप आवटे, राज्य साथरोग अधिकारी