आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोलच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल - एरंडोलमधील विवाहितेचा स्वाइन फ्लूमुळे रविवारी मृत्यू झाला. या महिलेची स्वाइन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. साईनगरातील रहिवासी भारती मनोहर खैरनार (वय ३३) यांना सुरुवातीला थंडी तापामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना मंगळवारी जळगावात दाखल केले. त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवले. तो अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...