आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यात पोलिस निरीक्षकावर तलवारीने हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - विधानभवनात उपनिरीक्षकाला आमदारांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच जुने धुळे भागात सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यावर मंगळवारी तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. होळीदरम्यान गल्ली क्रमांक 14 मधील बालगोपाल जिमजवळ दोन गटांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. घटना कळताच पाटील सहका-यांसह तेथे गेले होते.


वाद मिटवत असतानाच पाठीमागून त्यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर पसार झाला. पोलिसांनी पाटील याना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला 8 टाके पडले आहेत. रात्री 10 वाजता त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काही पुरावे हाती लागले असून, आरोपींना पकडण्यासाठी अटकसत्र राबवणार असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. याआधी 6 आॅक्टोबर 2011 रोजी दस-याच्या दिवशी या भागात दंगल झाली होती.