आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवार निर्मितीचा कारखाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगरात पाेलिसांनी गुरुवारी सायंकाळी ते वाजेदरम्यान काेंबिंग अाॅपरेशन केले. त्यात दाेन तलवारी, दाेन कुऱ्हाडी सापडल्या. विशेष म्हणजे ज्याच्या घरात हे हत्यार सापडले. त्याने ते स्वत: तयार केले असल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे राजीव गांधीनगरात तलवार बनवण्याचा कारखानाच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस अाली अाहे.
पाेलिसांना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास काही तरुण पिकअप व्हॅन घेऊन तलवारी खरेदी करण्यासाठी अाल्याची माहिती मिळाली हाेती. त्याच वेळी या भागात साेनसाखळी चाेरीचा प्रयत्न झाला. त्यामुळे पाेलिसांनी गस्त सुरू केली. परंतु, तलवार घेण्यासाठी अालेले तरुण गाडी घेऊन पळून गेले. त्यातील दाेघांची अाेळख रामानंदनगर पाेलिसांना पटली अाहे.
तसेच शहरात रामानंदनगरच्या पाेलिसांनी काेंबिंग अाॅपरेशन राबवले. त्यात अशाेक बावरी याच्या घरात दाेन तलवारी, दाेन कुऱ्हाडी, तलवार बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. मात्र, संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला.

विळ्या, पावशीच्या नावाखाली बनवतात तलवार
राजीवगांधीनगरातील शिकलकर जमातीचे लाेक राहतात. त्यांचा विळे, पावशी, सुडे, सुरे बनवण्याचा पिढीजात धंदा अाहे. मात्र, त्याच्या नावाखाली तलवारी बनवल्या जात असल्याची माहिती गुरुवारी समाेर अाली अाहे.