आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवरच अभ्यासक्रम उपलब्ध, विद्यार्थ्यांनी बनवले माहितीपूर्ण मोबाइल अॅप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकीच्या सर्व शाखांचा अभ्यासक्रम जळगावचे दर्पण पाटील संकेत पाटील या विद्यार्थ्यांनी मोबाइलवर उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एका क्लीकवर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
गोदावरी अभियांत्रिकीच्या कॉम्प्युटर शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी दर्पण पाटील गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिक शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी संकेत पाटील यांनी हे अॅप्स बनवले आहे. संशोधनाचा ध्यास असलेल्या या दोघांनी आतापर्यंत हे वे माहितीपूर्ण मोबाइल अॅप्स तयार केले आहे. यात रेल्वे टाइम-टेबल, बेबी नेम, एसटीडी कोड सर्चर, बॅक-बुक, लॉ-बुक हे अॅप्स बनवले आहेत. यात रेल्वे अॅप्सचा सुमारे दोन लाखांपेक्षा नागरिकांनी लाभ घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक स्वरुपात यांनी आपल्याच क्षेत्रातील अॅप्स बनवले. विद्यापीठाकडून पुरेशी माहिती उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय, फार्मसी, कायदा या शाखांचे अभ्यासक्रमही तयार करण्याचा मानस प्रोग्रॅमर दर्पण पाटील डिझायनर संकेत पाटील यांनी व्यक्त केला.
या शाखांचे असतील अभ्यासक्रम-
ऑटोमोबाइल,बायोटेक्नॉलॉजी, केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल या शाखांचा अभ्यासक्रम मोबाइल अॅप्सवर असणार आहे.

असा पहा अभ्यासक्रम-
हाअभ्यासक्रम बघण्यासाठी अँड्रॉइड मोबाइल फोन आवश्यक आहे. केवळ सुरुवातीसच इंटरनेटचा वापर करावा लागेल, अॅप्स डाऊनलोड झाल्यावर पुढे इंटरनेटची गरज पडत नाही. विद्यार्थ्यांनी मोबाइलवरील गुगल प्लेवर एनएमयू सिलॅबस असे टाइप करून ते डाऊनलोड करून घ्यावे. डाऊनलोड झाल्यावर विद्यार्थ्यांना सीजीपीए पॅटर्न नवीन अभ्यासक्रमही बघता येईल. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून हा अभ्यासक्रम डाऊनलोड केला आहे. या अॅप्समध्ये कोणत्या शाखेच्या विद्यार्थ्याने कोणते पुस्तक वापरावे यासह प्रॅक्टिकल, थेअरी कंपलसरी प्रश्न विषयानुसार मिळणारे गुणही यावर उपलब्ध आहेत. तसेच आपल्या आवडीची शाखा निवड सेमिस्टर निवडही करणे शक्य होईल. साडेतीन जीबी पर्यंतचा हा डाटा उपलब्ध आहे.