आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० रुपये द्या अन् नोंद मिळवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तहसीलकार्यालयातील अभिलेख कक्षात शेत-शिवारासह अन्य नोंदी घेण्यासाठी नियमानुसार अर्ज केला तर त्या वेळेवर मिळत नाहीत; मात्र कर्मचा-यांना तोंडी माहिती २० रुपये दिल्यास काही वेळातच नोंद मिळत असल्याचा अनागोंदी प्रकार सुरू आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी दीपक सोनवणे यांनी प्रतिज्ञापत्र देऊन तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.

अभिलेख कक्षातून कोणतीही नोंद मिळवण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज द्यावा लागतो. परंतु ७/१२ची छायांकित प्रत किंवा तोंडी माहितीवरून त्याच दिवशी नोंदी दिल्या जात असल्याचा प्रकार सध्या सुरू आहे. अर्ज करताच मागणी केलेला अभिलेख कक्षातील मूळ दस्तऐवज बिगर अर्जदार बाहेर घेऊन येतो. त्याची छायांकित प्रतीची फी दुकानदारास दिली जाते. तसेच स्वतंत्र २० रुपये दिल्यावर सही शिक्क्यानिशी नोंद प्रमाणित करून दिली जाते. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी हे दस्तऐवज कोणता आहे, तो कशा संबंधित आहे, याबद्दल कोणतीही चौकशी अथवा पडताळणी करता त्यावर स्वाक्षरी करतात. हा दस्ताऐवज देताना त्याची कोणतीही नोंद अभिलेख कार्यालयाकडे नसते.
तक्रार अर्ज प्राप्त, प्राथमिक तपासणी करण्यास सुरुवात

तक्रारअर्ज मंगळवारी मिळाला आहे. त्यासंदर्भात प्राथमिक तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. किती अर्ज आले, त्यातील किती जणांना नोंदी दिल्या याची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी योग्य चौकशी करण्यात येईल. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तसेच चुकीच्या गोष्टी त्वरित थांबवण्यात येतील. -तुकाराम शिंदे, तहसीलदार
बातम्या आणखी आहेत...