आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळी चोरांपासून अशी घ्या खबरदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोनसाखळीचोरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिस आता जनतेला सोनसाखळी चोरीच्याच तऱ्हा सांगून खबरदारीच्या दृष्टीने सूचना करणार आहेत. त्यासाठी शुक्रवारपासून शहरात तीन रिक्षांच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात दिवसाआड सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांना रस्त्यावर एकटे फिरणे अवघड झाले आहे. सोनसाखळी चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यासाठी पाेिलसातर्फे सोनसाखळी चोरीबाबत खबरदारी घेण्याचे उपाय जनतेला सुचविले जात अाहे.

याबाबत सावधानता बाळगायला हवी
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप, मजकूर, टिप्पणी शेअर अथवा फॉरवर्ड करू नये. दूरध्वनी, भ्रमणध्वनीवर बँक खाते एटीएमबाबत माहिती देऊ नये. भ्रमणध्वनी ई-मेलवर येणाऱ्या बक्षिसांच्या अामिषाला बळी पडू नये. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करावी.

नकली सीआयडींपासून सावध
महिलांनीअनोळखी व्यक्ती पाणी मागत असल्यास किंवा पत्ता विचारत असेल, तर जवळपास असलेल्या पुरुषास मदतीसाठी बोलवावे. त्याच्याशी दूरवरूनच बोलावे. महिलांनी सोनसाखळी चोरांपासून सावधानता बाळगावी. तत्काळ जनतेची मदत मागा पोलिसांशी संपर्क करावा. महिलांनी वेगवान दुचाकीस्वारांवर विशेष लक्ष असू द्यावे. काही लोक सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करून तपासणी करायची अाहे, असे सांगतात. त्यानंतर परस्पर पैसे दागिने घेऊन फरार होतात. त्या वेळी आजूबाजूच्या लोकांना माहिती द्यावी.

कधीहीघराचे दार एकाकी उघडू नये
सोनेदुप्पट करून देण्याचे अामिष दाखवणाऱ्यांची पोलिसांना माहिती कळवा. सोन्याची पॉलिश करून देतो, सोने दुप्पट करून देतो, स्वस्त दरात सोने देतो, असे कुणी सांगत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. घराचे दार एकाकी उघडू नये. तत्पूर्वी पिपहोल, खिडकीतून बाहेर पाहावे. आतील बाजूस सुरक्षा साखळी लावावी. रात्रीच्या वेळेस चारही बाजूंनी लाइट लावावेत. शेजाऱ्यांचे फोन नंबर जवळ ठेवावेत. कोणत्याही कुटुंबास ओळख पटल्यािशवाय भाडेकरू म्हणून ठेवू नये.