आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍याच्या लाचखोरीचा भंडाफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अतिरिक्त आयुक्त पी.डी. सोनवणे नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून पैशांची मागणी करीत असल्याचा भंडाफोड महासभेत झाला. या संदर्भात कैलास सोनवणे यांनी सी.सी.टीव्ही फुटेज आयुक्तांकडे सादर केले असून संबंधिंत अधिकार्‍यावर गंभीर कारवाईची मागणी केली आहे. इतर नगरसेवकांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

पालिकेत सोमवारी झालेल्या महासभेत पीठासीन अधिकारी महापौर राखी सोनवणे होत्या. व्यासपीठावर उपमहापौर सुनील महाजन, आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी नगरसचिव गोपालसिंग राजपूत होते. अधिकारी कामे ऐकत नसल्याकडे नगरसेवक रवींद्र पाटील, सुरेश भोळे यांनी लक्ष वेधले. यावेळी कैलास सोनवणे यांनी अतिक्रमण अधिकारी पी.डी.सोनवणे यांच्यावर आरोप करत सी.सी. टीव्ही फुटेज आयुक्तांकडे सादर केले. परिवहन समितीचे सदस्य संदीप मंडोरा, निशिकांत मंडोरा यांच्याकडे 7 जानेवारीला दुपारी 1.38 वाजेच्या सुमारास पी. डी. सोनवणे त्यांचे चालक सुशील धनगर याच्यासह गेले होते. आपले ओळखपत्र दाखवत त्यांनी या ठिकाणी बांधकाम तपासणी करून कागदावर 60 हजारांची मागणी केली. हा प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. अनंत जोशी यांनी पी.डी.सोनवणे यांनी अयोध्यानगरातही तोडीपाणी करण्याचा प्रय} केल्याचा आरोप केला. रवींद्र पाटील यांनी पहाटे मॉर्निंग वॉकच्या वेळीच पी.डी.सोनवणे अतिक्रमित घरे शोधत फिरत असल्याचा आरोप केला. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी सभागृहाला दिले.