आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Talathi And Circle Officers Now Face Action In Jamner

साग लागवडीची नोंद न करणा-या तलाठी व मंडळ अधिका-यांवर होणार कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - बोदवड रोडवरील गट क्रमांक 959 मधील शेतातील साग लागवडीची शहानिशा न करता नोंदी केल्याप्रकरणी तत्कालीन 24 तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना दोषी ठरवून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत.


खासदार ईश्वरलाल जैन यांनी त्यांच्या नावावर असलेल्या या 20 हेक्टर सहा आर क्षेत्रापैकी 17 हेक्टर 52 आर शेतजमिनीत साग लागवड केली होती. सागाच्या रोपांची लागवड करण्यासाठी दोन रोपांमधील अंतर दोन बाय एक मीटर असल्यास 87,600 ऐवढय़ाच रोपांची लागवड त्या क्षेत्रात होऊ शकते. मात्र, तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष मोजणी न करता दीड लाख रोपांची लागवड केल्याच्या नोंदी उतार्‍यावर केल्या. याप्रकरणी उल्हास देवराम साबळे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली होती.

दरम्यान, याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित करून पुन्हा चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाली आहे. तसे आदेश उपविभागीय अधिकारी जळगाव भाग जळगाव यांनी जामनेर तहसीलदारांना दिले आहेत. सदर प्रकरणात तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी उतार्‍यावर नोंदी करताना अनियमितता व दिरंगाई केल्याचे अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे पत्र क्रमांक कुळका ।कावी ।3। 792 ।2013 नुसार संबंधित तलाठी व अधिकार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करून 22 मार्च 1980 पासूनचे सर्व संबंधित सर्व 24 तलाठी, मंडळ अधिकार्‍यांना 1 जानेवारी 2014 रोजी नोटिसा बजावण्यात आल्या व 10 जानेवारी 2014 पूर्वी म्हणने मांडण्यासाठी संधी दिली होती.