आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी तलाठी उत्तरपत्रिकेवर क्रमांक टाकायचे विसरले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 12 ते 15 तासांत लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, भावी तलाठय़ांपैकी तब्बल 15 टक्के परीक्षार्थी उत्तर पत्रिकेवर बैठक क्रमांक टाकण्यास विसरले किंवा तो चुकीचा टाकण्यात आल्यामुळे प्रशासनाचे सर्व गणित बिघडले; त्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या टीमला दोन रात्री कार्यालयात तळ ठोकावा लागला. सोमवारी रात्री 12 वाजेनंतर निकाल संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला.

सोमवारी गणेश चतुर्थीची सुटी असल्याने रविवारी परीक्षा झाल्यानंतर रात्रभरात निकाल जाहीर करण्याचे प्रशासनाचे नियोजन परीक्षार्थींच्या चुकीमुळे फिस्कटले. रविवारी सायंकाळी 6 वाजता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात झाली. रात्री 12 वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू होती. मात्र, तांत्रिक चुकांचा मुद्दा पुढे आला. अनेक उत्तरपत्रिकांवर बैठक क्रमांकच नव्हता; तर काहींनी चुकीच्या पद्धतीने टाकला होता. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थीच्या हजेरीपटावरून उत्तरपत्रिका क्रमांकाची खात्री करण्यात आली. मॅन्युअली दुरुस्ती करून ती संगणकावर भरण्यात आल्यानंतर सॉफ्टवेअरने या उत्तरपत्रिका स्वीकारल्या.

चुकांमुळे झाला उशीर
परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेवरील बैठक क्रमांक, उत्तरपत्रिका क्रमांक ही माहिती भरण्यात अनेक चुका केल्या. त्यामुळे मशीनमधून बाहेर पडलेल्या उत्तरपत्रिकांमधील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात वेळ गेला. एकही उत्तर पत्रिका बाद होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली.
-धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी